क्रिकेटच्या मैदानानंतर अभिनयाच्या व्यासपीठावर झळकणार विराट कोहली; ‘या’ सुपरस्टारसोबत करणार काम!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2017 19:03 IST
टीव्ही जगतात लवकरच इतिहास लिहिला जाणार आहे. होय, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली बॉलिवूडचा मिस्टर परफेक्टनिस्ट आमीर खान ...
क्रिकेटच्या मैदानानंतर अभिनयाच्या व्यासपीठावर झळकणार विराट कोहली; ‘या’ सुपरस्टारसोबत करणार काम!
टीव्ही जगतात लवकरच इतिहास लिहिला जाणार आहे. होय, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली बॉलिवूडचा मिस्टर परफेक्टनिस्ट आमीर खान याच्यासोबत लवकरच एक शोमध्ये झळकणार आहे. होय, लवकरच दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एक शोची निर्मिती केली जाणार असून, त्यामध्ये आमीर आणि विराट झळकणार आहेत. सध्या आमीर त्याच्या आगामी ‘सीक्रेट सुपरस्टार’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट दिवाळीला म्हणजेच १९ आॅक्टोबर रोजी रिलीज होणार आहे. तर विराट सध्या आॅस्ट्रेलिया विरुद्धच्या सिरीजमध्ये व्यस्त आहे. रिपोर्ट्सनुसार आमीर सिंगापूर येथे त्याच्या ‘सीक्रेट सुपरस्टार’ या चित्रपटाचे प्रमोशन करीत आहे. त्यामुळे मोठ्या मुश्किलीने एक दिवसाचा वेळ काढून तो मुंबईत पोहोचला आहे. हा एक चॅट शो असणार आहे. या शो च्या माध्यमातून प्रेक्षकांना दोन्ही सेलिब्रिटींच्या जीवनाविषयीची माहिती मिळणार आहे. त्यातच विराट या शोमध्ये झळकणार असल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. विराटला माध्यमापासून दूर राहण्यासाठी ओळखले जाते. त्यामुळे त्याला छोट्या पडद्यावर तेही आमीर खानसोबत बघायला त्याच्या चाहत्यांना नक्कीच आवडेल. तर दुसरीकडे आमीरला लोकांसोबत बोलताना खूपच हजरजबाबी समजले जाते. त्यामुळे हा चॅट शो टीआरपीचा एक नवा इतिहास निर्माण करण्याची शक्यता आहे. चॅनेलने या शो च्या प्रमोशनसाठी विशेष प्लॅनिंग केली असल्याचेही समजते. ‘सीक्रेट सुपरस्टार’ प्रवक्त्यास याविषयी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्यास दुजोरा दिला आहे. दरम्यान, आमीरच्या या चित्रपटाला त्याची पत्नी किरण राव हिने प्रोड्यूस केले आहे. या चित्रपटाची कथा अद्वैत चौहान यांनी लिहिली आहे. चित्रपटात दंगल गर्ल जायरा वसीम मुख्य भूमिकेत बघावयास मिळणार आहे. तर आमीर या चित्रपटात कॅमिओ करताना दिसणार आहे. दुसरीकडे विराट आॅस्ट्रेलियाविरुद्धची सिरीजमध्ये व्यस्त आहे. विराटसेनेने आॅस्ट्रेलियाला एकदिवसीय मालिकेत ४-१ अशा फरकाने लोळविल्यानंतर टी-२० मालिकेत असाच दणदणीत विजय मिळविण्याची तयारी करीत आहे.