Join us

विपल्व-धानीची होणार भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2016 14:46 IST

इश्क का रंग सफेद या मालिकेत विप्लवची त्याची मुलगी विधाशी झालेली भेट आपल्याला नुकतीच पाहायला मिळाली. यानंतर आता विप्लव ...

इश्क का रंग सफेद या मालिकेत विप्लवची त्याची मुलगी विधाशी झालेली भेट आपल्याला नुकतीच पाहायला मिळाली. यानंतर आता विप्लव आणि धानीची भेट होणार आहे. धानी आणि विप्लव दोघांची एका लग्नामध्ये भेट होणार आहे. धानी आणि विप्लव समोरासमोर आल्यावर विधा ही धानीची मुलगी असल्याचे विप्लवला कळणार आहे. पण यामुळे त्या दोघांमध्ये गैरसमज निर्माण होणार आहे. विधाला पाहून धानीने पुन्हा लग्न केले आहे आणि ती तिचा भूतकाळ विसरलेली आहे असा समज विप्लवचा होणार आहे.