Join us  

प्रत्युषा बॅनर्जीच्या मृत्यूच्या 5 वर्षानंतर विकास गुप्ताने केला असा खुलासा, वाचून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 4:31 PM

विकास गुप्ताने पुन्हा एकदा पर्सनल लाईफबद्दलचा मोठा व धक्कादायक खुलासा केला आहे. काय म्हणाला विकास गुप्ता?

ठळक मुद्देप्रत्युषा बॅनर्जीचे 1 एप्रिल 2016 रोजी निधन झाले होते. तिने आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले होते.

टीव्ही अभिनेता विकास गुप्ता (Vikas Gupta) काही महिन्यांपूर्वी ‘बिग बॉस 14’च्या घरात गेला आणि यादरम्यान त्याच्या पर्सनल आयुष्याबद्दलच्या अनेक गोष्टी चव्हाट्यावर आल्यात. विकास गुप्ताची सेक्शुअ‍ॅलिटी, त्याचा आईसोबतचा वाद, त्याच्या आयुष्यातील आर्थिक अडचणी अशा अनेक गोष्टींचा खुलासा झाला. आता विकास गुप्ताने पुन्हा एकदा पर्सनल लाईफबद्दलचा मोठा व धक्कादायक खुलासा केला आहे. होय, मी दिवंगत अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीला  ( Pratyusha Banerjee) डेट करत होतो, असा खुलासा त्याने केला आहे.विकास गुप्ता सध्या कोरोनाशी लढतोय. काही दिवसांपूर्वीच त्याला कोरोनाची लागण झाली. त्यापूर्वी ई टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत विकास गुप्ताने अनेक खुलासे केलेत. (Vikas Gupta has revealed that he dated late actor Pratyusha Banerjee )

काय म्हणाला विकास गुप्ता?तू कधी कुण्या मुलीला डेट केले आहे का? मित्र दूर जात होते म्हणून तू तुझ्या सेक्शुअ‍ॅलिटीचा खुलासा केलास का? असे प्रश्न विकासला या मुलाखतीत विचारण्यात आले. यावर मी प्रत्युषा व अन्य एका मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये होतो, असे त्याने सांगितले. तो म्हणाला, मी दोन मुलींसोबत रिलेशनशिपमध्ये होतो. यापैकी एक प्रत्युषा बॅनर्जी होती आणि दुसरीच्या नावाचा खुलासा मी करू शकत नाही. मी बायसेक्शुअल आहे, हे प्रत्युषाला माहित नव्हते. आमचे ब्रेकअप झाले, त्यानंतर तिला याबद्दल कळले होते. आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो, पण हे रिलेशन फार कमी वेळासाठी होते. काही लोकांनी माझ्याबद्दल तिला वाईट वाईट गोष्टी सांगितल्या होत्या आणि म्हणून प्रत्युषा व माझे ब्रेकअप झाले होते. पण मी आता याबद्दल फार बोलू इच्छित नाही. कारण प्रत्युषा आता या जगात नाही. ब्रेकअपनंतर मी प्रत्युषावर खूप नाराज होतो. एकदा ती मला रस्त्यात भेटली, पण मी तिच्याकडे दुर्लक्ष केले होते. तिने मला बोलवून, तू असा कसा वागू शकतोस? असे विचारले होते. प्रत्युषा मला खूप आवडायची. मला तिच्यासोबत एक मोठा प्रोजेक्ट करण्याची इच्छा होती. पण ती त्यापूर्वीच जगातून निघून गेली.

प्रत्युषा बॅनर्जीचे 1 एप्रिल 2016 रोजी निधन झाले होते. तिने आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले होते. तेव्हा ती राहुल राज सिंह याला डेट करत होती. प्रत्युषाच्या मृत्यूसाठी तिच्या या बॉयफ्रेन्डला जबाबदार ठरवण्यात आले होते. प्रत्युषाच्या पालकांनी राहुल राज सिंहवर मुलीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप करत, गुन्हा दाखल केला होता.

टॅग्स :टेलिव्हिजनबिग बॉस १४