Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video : बिग बॉस विजेत्याला पबमध्ये झाली मारहाण, यादरम्यान त्याच्या डोक्यावर फोडल्या काचेच्या बाटल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2020 13:19 IST

Bigg Boss : बिग बॉस विजेत्याला झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे.

बिग बॉस विजेत्याला झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे. नुकताच हा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्यक्ती म्हणजे बिग बॉस तेलगू सीझन ३चा विजेता गायक राहुल सिप्लिगुंज. ही घटना पबमध्ये घडली आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार सांगितलं जातंय की, बुधवारी राहुल एका पबमध्ये गेला होता. तिथे काही लोकांनी त्याला घेरले आणि त्याला मारहाण करू लागले. ही गोष्ट इतकी वाढली की लोकांनी राहुलला मारहाण करायला सुरूवात केली आणि यादरम्यान त्याच्या डोक्यावर काचेच्या बाटल्या फोडल्या. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

बिग बॉस तेलगू तिसऱ्या सीझनचा विजेता राहुल सिप्लिगुंजच्या मारहाणीचा व्हिडिओ ट्विटरवर बऱ्याच लोकांनी शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. खरेतर मीडिया रिपोर्ट्सनुसार राहुल एका पबमध्ये आपल्या मित्रांसोबत गेला होता. तिथे तो त्यांच्या मित्रांसोबत एन्जॉय करत होता. तिथे काही अज्ञात लोकांच्या ग्रुपने राहुलला घेरले आणि वाईटरित्या मारू लागले. त्या लोकांनी राहुलच्या मित्रांसोबतही वाईट वर्तणूक केली. 

राहुलने सांगितले की, त्या लोकांनी आधी वाद घातला आणि नंतर मारामारी करू लागले. त्याच्या वर्तुणूकीला विरोध केला म्हणून सगळे भडकले आणि मारहाण करू लागले. या घटनेत राहुलला थोडीफार दुखापत झाली आहे. त्यानंतर तिथल्या लोकांनी व सुरक्षा रक्षकांनी त्यांचा बचाव केला. या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

बिग बॉस तेलगू ३मध्ये राहुल सर्वात चर्चित कंटेस्टंट आणि विजेता राहिला आहे. त्याला या शोचा विजेता म्हणून ५० लाख रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले होते. तो या शोच्या विजेत्यासोबत गायक, गीतकार व संगीतकारदेखील आहे. त्याने काही साऊथ चित्रपटात काम केले आहे.

टॅग्स :बिग बॉस