ज्येष्ठ अभिनेत्री अमिता उदगाता यांचे निधन,या लोकप्रिय मालिकेत केले होते काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2018 14:45 IST
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'प्रतिज्ञा' फेम ज्येष्ठ अभिनेत्री अमिता उदगाता यांचे मंगळवारी निधन झाले.गेल्या बऱ्याच दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार ...
ज्येष्ठ अभिनेत्री अमिता उदगाता यांचे निधन,या लोकप्रिय मालिकेत केले होते काम
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'प्रतिज्ञा' फेम ज्येष्ठ अभिनेत्री अमिता उदगाता यांचे मंगळवारी निधन झाले.गेल्या बऱ्याच दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. अमिता यांना व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आलं होतं. पण, फुफ्फुसं निकामी झाल्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली.अमिता यांनी आजवर बऱ्याच मालिकांतून विविध भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली होती. ‘प्रतिज्ञा’,कुछ रंग प्यार के ऐसे भी,'महाराणा प्रताप', 'बाबा ऐसो वर ढूंडो', 'डोली अरमानों की' अशा या मालिकेतील त्यांच्या भूमिका लक्षवेधी ठरल्या.१९६५-६६ मध्ये त्यांनी रंगभूमीवर काम करत अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.त्यांच्या निधनामुळे टीव्हीविश्वात शोककळा पसरली आहे.