Join us  

Bigg Boss Marathi 2: अभिजीतनंतर हे सदस्य जाणार अडगळीच्या खोलीत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 11:31 AM

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल हल्ला बोल हे कॅप्टनसी कार्य अभिजीत केळकर आणि शिवानी सुर्वेमध्ये रंगले.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल हल्ला बोल हे कॅप्टनसी कार्य अभिजीत केळकर आणि शिवानी सुर्वे मध्ये रंगले ज्यामध्ये शिवानीने बाजी मारून घराची नवी कॅप्टन होण्याचा मान पटकावला. टास्क दरम्यान सदस्यांमध्ये बरेच वाद, आरोप – प्रत्यारोप झाले, ओढाताणी झाली. पण या सगळ्यावर मात करून शिवानी हा टास्क जिंकली. टास्कमध्ये माधव ज्याप्रकारे खेळला त्याला अभिजीतच्या टीमने विरोध केला. टास्कच्या आधी नेहा आणि शिवानी तर टास्क दरम्यान हीना - आणि शिवानीमध्ये वाद रंगला. शिवानी हीनाला तिच्या आईवरून जे काही बोली ते तिला अजिबात आवडले नाही. तर रुपालीने देखील शिवानी ज्याप्रकारे तिला टास्क मध्ये चांगली खेळली याबद्दल बोलली ते आवडले नाही आणि तिने हि गोष्ट विणाला सांगितली. आज घरामध्ये “एकला चलो रे” हे नॉमिनेशन कार्य रंगणार आहे. तेव्हा कोण या आठवड्यात घराबाहेर जाण्याच्या प्रक्रीयेमध्ये नॉमिनेट होणार ? कोण सेफ होणार ? हे बघणे रंजक असणार आहे.

या कार्या दरम्यान विणा आणि हीनाला घरामध्ये कुजबुज करण्यास सक्त मनाई आहे अशी घोषणा बिग बॉसनी केली. आणि शिवानीने या दोघींना अडगळीच्या खोलीमध्ये डांबले, आणि या खोलीमध्ये बोलण्यास मनाई असल्याचे तिने सांगितले. त्यावर विणा आणि हीना म्हणाल्या आत आलो आहे ना आतमध्ये मग का नाही बोलायचे ? त्यावर शिवानी म्हणाली मी कॅप्टन आहे माझे पण काही नियम असूच शकतात. 

टॅग्स :बिग बॉस मराठीवीणा जगतापहिना पांचाळ