Join us

नकुशी या मालिकेत उषा नाडकर्णींची एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2017 14:43 IST

उषा नाडकर्णी यांनी सिंहासन, माहेरची साडी, देऊळ, अगडबम यांसारख्या मराठी चित्रपटात तर वास्तव, ये तेरा घर ये मेरा घर, ...

उषा नाडकर्णी यांनी सिंहासन, माहेरची साडी, देऊळ, अगडबम यांसारख्या मराठी चित्रपटात तर वास्तव, ये तेरा घर ये मेरा घर, भूतनाथ रिटर्न्स, रुस्तम यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. मराठी आणि हिंदी दोन्ही चित्रपटसृष्टीत त्यांनी त्यांची एक जागा निर्माण केली आहे. पवित्र रिश्ता या मालिकेत त्यांनी साकारलेली सविता देशमुखची भूमिका तर खूपच गाजली होती. या मालिकेसाठी त्यांना अनेक पुरस्कारदेखील मिळाले आहेत. या मालिकेमुळे खाष्ट सासू अशी त्यांची ओळखच बनली होती. त्या सध्या खुलता कळी खुलेना या मालिकेत दिसत आहेत. या मालिकेत त्या साकारत असलेली अक्का ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. आता उषा नाडकर्णी प्रेक्षकांना एका नव्या रूपात पाहायला मिळणार आहेत. उषा नाडकर्णी यांची ‘नकुशी..तरीही हवीहवीशी’  या मालिकेत लवकरच एंट्री होणार आहे. त्यांच्या एंट्रीनंतर मालिकेच्या कथानकाला नवे वळण मिळणार आहे. मात्र, त्यांच्या भूमिकेचे तपशील अद्याप गुलदस्त्यात आहेत.अत्यंत वेगळ्या विषयावरील ‘नकुशी..तरीही हवीहवीशी’ या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. सकस कथानक, उत्तम अभिनेते ही या मालिकेची वैशिष्ट्य आहेत. ग्रामीण महाराष्ट्र ते बग्गीवाला चाळीच्या रूपाने बऱ्याच काळानंतर एक वेगळा विषय हाताळला गेला आहे. त्यातल्या व्यक्तिरेखाही लोकप्रिय झाल्या. नकुशी आणि रणजित यांचे नातं आता फुलते आहे, त्यांच्याकडे गोड बातमीही आहे. या पार्श्वभूमीवर उषा नाडकर्णी यांचा प्रवेश होणं हा मालिकेतला महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.उषा नाडकर्णी यांची व्यक्तिरेखा काय आहे आणि त्यांच्या येण्याने कथानक काय वळणं घेतं याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.Also Read : अभिनेत्री नाही तर मला डेन्टिस्ट बनायचे होते ः प्रसिद्धी आयलवार