Join us

​उपेंद्र का राहातोय चाळीत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2016 17:48 IST

उपेंद्र लिमयेने गेल्या काही वर्षांत मराठी इंडस्ट्रीत आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. जोगवा या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे ...

उपेंद्र लिमयेने गेल्या काही वर्षांत मराठी इंडस्ट्रीत आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. जोगवा या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे तर सगळ्यांनीच कौतुक केले होते. केवळ मराठी चित्रपटामध्येच नव्हे तर बॉलिवूडमध्येदेखील त्याच्या अभिनयाची चुणूक आपल्याला पाहायला मिळाली होती. मधुर भांडारकरच्या गाजलेल्या पेज थ्री या चित्रपटातही त्याने महत्त्वाची भूमिका साकारली होती. हाच उपेंद्र सध्या एका चाळीत राहातोय.बॉलिवूडचे सेलिब्रेटी म्हटले की ते राहाण्याची पहिली पसंती ही जुहू, पेडर रोड या उच्चूभ्रू लोकांची वस्ती असलेल्या ठिकाणांना देतात. मराठी सेलिब्रेटी दादर, विलेपार्ले या मराठमोळी वस्ती असलेल्या भागांमध्ये राहात असल्याचे आपल्याला अधिक पाहायला मिळते. असे असतानाही हा उपेंद्र सध्या एका लालबागच्या चाळीत का राहात आहे? खरे तर तो चाळीत राहात असल्याचे तुम्हाला कोणी सांगितले तर तुमचा यावर विश्वास बसेल का? हो पण हे खरे आहे. उपेंद्र सध्या लालबागमधील एका घरात राहात आहे. पण तो काही खऱ्या आयुष्यात लालबागला राहात नाही. तर तो एका मालिकेत लालबागला राहात असल्याचे दाखवण्यात येणार आहे. बेधुंद मनाच्या लहरी या मालिकेत त्याने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला काम केले होते. चित्रपट, नाटकांमध्ये व्यग्र झाल्यानंतर उपेंद्र छोट्या पडद्यापासून दूर राहिला. पण आता जवळजवळ साडे आठ वर्षांनंतर तो छोट्या पडद्यावर परतत आहे. उपेंद्र लवकरच एका मालिकेत झळकणार असल्याचे कळतेय. या मालिकेत तो लालबागच्या चाळीत राहाणाऱ्या एका सामान्य मुलाची व्यक्तिरेखा साकारणार आहे.