Join us  

'ललित २०५' मालिकेत संक्रांतीचे अनोखे सेलिब्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 1:31 PM

'ललित २०५' मालिकेमध्ये मकर संक्रांत साजरी होणार आहे. भैरवीची पहिलीच संक्रांत असल्यामुळे राजाध्यक्ष कुटुंबात जल्लोष पाहायला मिळतो आहे.

ठळक मुद्दे'ललित २०५' मालिकेमध्ये होणार मकर संक्रांत साजरी भैरवीने वाण म्हणून दिले तुळशीचे रोपटे

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ललित २०५' मालिकेमध्ये मकर संक्रांत साजरी होणार आहे. भैरवीची पहिलीच संक्रांत असल्यामुळे राजाध्यक्ष कुटुंबात जल्लोष पाहायला मिळतो आहे. काळी साडी आणि हलव्याच्या दागिन्यांनी भैरवीचे सौंदर्य आणखी खुलून आले होते. भैरवीप्रमाणेच राजाध्यक्षांच्या इतर सुनाही नटून थटून तयार होत्या. तिळाचे लाडू, पतंग उडवण्याची चुरस आणि गुळपोळीचा खात बेत संक्रांतीच्या सणासाठी आखण्यात आला आहे. संक्रांतीला हळदीकुंकू आणि वाण लुटण्याची प्रथा आहे. भैरवीने वाण म्हणून तुळशीच रोपट देत पर्यावरण रक्षणाच्या हेतूने पुढे पाऊल टाकले.

‘मराठी संस्कृतीत सणावारांना विशेष महत्त्व आहे. या निमित्ताने केली जाणारी व्रतवैकल्य आपल्याला निसर्गाशी जोडत असतात. हेच महत्व लक्षात घेऊन तुळशीचे रोप देण्याची अनोखी संकल्पना आम्हाला सुचली आणि आम्ही ती अंमलात आणली अशी भावना भैरवी म्हणजेच अमृता पवारने व्यक्त केली.’ राजाध्यक्ष कुटुंबातले हे अनोखे सेलिब्रेशन १५ जानेवारीला रात्री ८.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर पाहायला मिळणार आहे.

आदेश बांदेकर यांच्या सोहम प्रोडक्शनने या मालिकेची निर्मिती केली आहे. आदेश बांदेकर यांचा सुपुत्र सोहम बांदेकर या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच निर्माता म्हणून समोर येणार आहे. 'ललित २०५'मध्ये सुहास जोशी, सागर तळाशीकर, धनश्री दवांगे, संग्राम समेळ, अमृता पवार, अनिकेत केळकर, कीर्ती मेहेंदळे, अमोघ चंदन, मानसी नाईक हे कलाकार या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. शिरीष लाटकर या मालिकेचे लेखन करत आहेत. या मालिकेच्या चित्रीकरणासाठी ठाणे येथे खास सेट उभारण्यात आला आहे.

टॅग्स :ललित 205संग्राम समेळ