Join us  

Photos: स्वीटूनंतर आता चिन्याही रमणार संसारात; किंजलसोबत होणार थाटात साखरपुडा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2022 11:50 AM

Yeu kashi tashi me nandayla: काही दिवसांपूर्वीच या मालिकेत चिन्याची गर्लफ्रेंड किंजल प्रेक्षकांच्या भेटीला आली. विशेष म्हणजे आता चिन्या आणि किंजल यांचा साखरपुडा होणार आहे.

छोट्या पडद्यावरील 'येऊ कशी तशी मी नांदायला' (yeu kashi tashi me nandayla) ही मालिका सध्या चांगलीच लोकप्रिय होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच स्वीटू आणि ओम यांचं लग्न झालं आहे. त्यामुळे ही जोडी त्यांच्या वैवाहिक जीवनात रमली आहे. विशेष म्हणजे स्वीटूचं लग्न झाल्यानंतर या मालिकेत आणखी एका नव्या अभिनेत्रीची एन्ट्री झाल्याचं पाहायला मिळालं. काही दिवसांपूर्वीच या मालिकेत चिन्याची गर्लफ्रेंड किंजल प्रेक्षकांच्या भेटीला आली. विशेष म्हणजे आता चिन्या आणि किंजल यांचा साखरपुडा होणार आहे.

एका इन्स्टाग्राम पेजवर येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेच्या सेटवरील काही फोटो शेअर करण्यात आले आहेत. या फोटोंमध्ये चिन्या आणि किंजल यांचा साखरपुडा होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे साळवींच्या कुटुंबातील स्वीटूची कमतरता आता किंजल भरुन काढतांना दिसणार आहे.

येऊ कशी तशी मी नांदायला: चिन्याची गर्लफ्रेंड खऱ्या आयुष्यात आहे प्रचंड बोल्ड; पाहा सुवेधा देसाईचे ग्लॅमरस फोटो

दरम्यान, या मालिकेत अभिनेत्री सुवेधा देसाई ही चिन्याच्या गर्लफ्रेंडची किंजली भूमिका साकारत आहे. यात ती एका गुजराती मुलीची भूमिका वठवत आहे. यापूर्वी सुवेधाने  महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात झळकली आहे. तसंच तिने अनेक रिअॅलिटी शोमध्येही काम केलं आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकार