Join us  

इतरांना धडकी भरवणा-या एकताला वाटते 'या'गोष्टींची भीती !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2019 6:30 AM

नुकतेच एकता कपूरने नवीन वेब सिरीज ‘बू’चे प्रमोशनसाठी कपिल शर्माच्या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी एकताचे अनेक रहस्य कपिल शर्माने उघड केले.

डेली सोप क्वीन एकता कपूर तिच्या कामा व्यतिरिक्त वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते कधी, तिच्या लग्नाची चर्चा होते तर कधी तिच्या खाजगी जीवनाशी निगडीत एखादा मुद्दा चर्चेचा विषय बनतो. बेधडक आणि रोखठोक भूमिका मांडणारी निर्माती एकताची ओळख.  आता पुन्हा एकदा एकता कपूर चर्चेत आहे. नुकतेच एकता कपूरने नवीन वेब सिरीज ‘बू’चे प्रमोशनसाठी कपिल शर्माच्या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी एकताचे अनेक रहस्य कपिल शर्माने उघड केले. त्यातील एक म्हणजे इतरांना थरकाप भरवणारी एकताला भुतांची भीती वाटते. “मी हॉरर वेब सिरीज व चित्रपट बनवत असले तरी मला स्वत:ला भूतांची भीती वाटत असल्याचे तिने यावेळी सांगितले.’

इतकेच नाही तर प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीची भीती ही वाटत असते. तिला विमानप्रवासाचीही खूप भीती वाटते. अर्चना पुरणसिंहबरोबर  प्रवास करते वेळी तिने अर्चनाचा 15/20 मिनीटं हात घट्ट पकडून ठेवल्याचे खुद्द अर्चनाने यावेळी सांगितले.

तसेच  एकताचा इतरांप्रमाणे सोशल मीडियावर बोलबाला असल्याचे पाहायला मिळते. चाहत्यांसह कनेक्ट राहण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी शेअर करत असते. नुकतेच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात 'कसम'' से मालिकेतील मुख्य जोडी प्राची देसाई व राम कपूर रोमांस करताना दिसत आहेत. या मालिकेत बानीची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राची देसाई फक्त १७ वर्षांची होती. तर राम कपूर मिस्टर वालियाची भूमिका करत होता. त्यावेळी प्राचीने रामसोबत किसिंग सीन करण्यासाठी नकार दिला होता. 

एकताने लिहिले की, या तीन मिनिटांचा सीक्वन्स शूट करण्यासाठी आम्हाला तीन दिवस लागले होते. बानीने मिस्टर वालियाला किस करण्यास नकार दिला होता. सतरा वर्षांच्या अभिनेत्रीला कोणतीही लाज वाटण्यापासून बचाव करण्यासाठी आम्ही शॅडो व लाइट्सचा वापर केला होता. त्यामुळे हा  सीन बालाजीमधील सर्वात चर्चित आणि टॉप रेटेड बनला होता. ज्यांनी कसम से, मिस्टर वालिया व बानी यांचा रोमांस मिस केला. राम या मालिकेत खूप चांगला वाटला. 

टॅग्स :एकता कपूर