Join us  

'सो कॉल्ड श्रीमंत लोक मनानेही श्रीमंत होऊ देत', आर्थिक तंगीत सापडलेल्या अभिनेत्रीला मेकअपमॅनने केली मदत 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 1:12 PM

आर्थिक अडचणीत सापडलेल्या या अभिनेत्रीनं म्हटलं की मला आश्चर्य वाटतं ज्यांच्याकडे माझे लाखो रुपये आहेत ते माझा फोनही उचलत नाहीत आणि माझे कष्टाने कमावलेले पैसेही परत करण्यास तयार नाहीत.  

कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्येकाला अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यातच आता लॉकडाउन आणखीन वाढविण्यात आले आहे. अशा परिस्थितीत असे बरेच कलाकार आहेत जे आर्थिक तंगीत सापडले आहेत. नुकतेच सयंतानी घोष आणि विनीत रैना या कलाकारांनी त्यांना येणाऱ्या आर्थिक अडचणींबद्दल सांगितले होते. आता छोट्या पडद्यावरील अभिनेत्री सोनल वेंगुर्लेकर हिनेही सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले की ती सध्या आर्थिक संकटात सापडली आहे. अखेर तिला तिच्या मेकअपमॅनने मदत केली आहे.तिने तिच्या मेकअपमॅनचे सोशल मीडियावर आभार मानले आहेत.सोनल वेंगुर्लेकरने लिहिले की, 'आज मी हे माझ्या मेकअपमॅनबरोबर शेअर करत आहे की, पुढील महिन्यातल्या खर्चासाठीही माझ्याकडे जास्त पैसे नव्हते, कारण बऱ्याच निर्मात्यांनी माझे पैसे अजूनही दिलेले नाहीत आणि ते बराच काळ रखडले आहेत. मला माझ्या मेकमॅनची काळजी वाटत होती, तो या परिस्थितीला कसा समोर जाईल, त्याची पत्नी गरोदर आहे आणि त्यासाठी खर्चही बराच आहे. मात्र त्याच्याकडून मला आलेल्या मेसेजची मी अपेक्षादेखील केली नव्हती. त्याचा मेसेज वाचताच माझ्या डोळ्यांत पाणी आले. मेकअपमॅन मला म्हणाला, 'मॅम, माझ्याकडे आत्ता १५ हजार रुपये आहेत, तुम्हाला हवे असल्यास तुम्ही घ्या आणि माझ्या बायकोच्या डिलिव्हरीवेळी परत द्या.' सोनलने आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिले, 'मला आश्चर्य वाटते की ज्यांच्याकडे माझे लाखो रुपये अडकले आहेत ते माझा फोनही उचलण्यास तयार नाहीत, त्यांनी मला ब्लॉक केले आहे आणि माझे कष्टाने कमावलेले पैसेही ते परत करण्यास तयार नाहीत. माझा एक मेकअप मॅन पंकज गुप्ता जो नेहमी मला माझ्या कुटूंबासारखा आहे तो मला पैसे देत आहे. सर्वात मोठी गोष्ट ही नाही कि त्याने मला पैसे दिले, मोठी गोष्ट ही आहे की अजूनही त्याच्याकडे पैसे नाही आहेत, परंतु यानंतरही, त्याने माझ्याबद्दल विचार केला. हे सो कॉल्ड श्रीमंत लोक मनानेही श्रीमंत होऊ देत. मला यासारख्या लोकांसाठी वाईट वाटते. '

सोनलने 'शास्त्री सिस्टर्स', 'ये वादा रहा' आणि 'साथ दौंड भिडे' अशा बर्‍याच मालिकांमध्ये काम केले आहे.

टॅग्स :सोनल वेंगुर्लेकरटिव्ही कलाकारकोरोना वायरस बातम्या