टेलिव्हिजनवरील संस्कारी सून क्रिस्टल डिसूझा (Krystal D'souza) ही 'एक हजारों में मेरी बहना है' या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झाली. या मालिकेत तिच्या बहिणीसाठी काहीही करणारी अभिनेत्री प्रेक्षकांना खूप आवडली. या शोनंतर क्रिस्टल आणि निया दोघींनाही खूप लोकप्रियता मिळाली. आता क्रिस्टलने छोट्या पडद्याला रामराम केला असून सध्या ती ओटीटीवर काम करत आहे. अभिनेत्री त्यांच्या फिटनेसची विशेष काळजी घेतात. त्यामुळे त्या दररोज व्यायाम करतात. पण क्रिस्टल जिमला जात नाही. जिमला गेल्यानंतर तिचे वजन वाढू लागले, ज्यामुळे तिने जिमला जाणे बंद केले, असा खुलासा तिने एका मुलाखतीत केला आहे.
क्रिस्टल एकदा भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्टमध्ये गेली होती. जिथे तिने तिच्या आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या. तसेच सांगितले की ती जिमला जात नाही. जिमला न जाता ती खूप बारीक आहे. क्रिस्टलने सांगितले की ती दररोज बाहेरचे जेवण खाते कारण तिचे मित्र दररोज घरी येतात आणि पार्टी करतात. ते एकत्र बसतात, गेम खेळतात आणि रात्री उशिरापर्यंत गप्पा मारतात.
या कारणामुळे क्रिस्टल जिमला जात नाहीहर्षने क्रिस्टलला विचारले की ती जिमला जाते का? यावर उत्तर देताना क्रिस्टल म्हणाली की, नाही, अजिबात नाही. मी आधी जायचे. जिमला जाऊन मी जाड झाले. माझ्यासोबत उलट घडले. बारीक होण्याऐवजी माझं वजन वाढू लागलं. माझ्यासोबत असे का झाले हे मला समजले नाही. जिमला जाणे बंद करताच मी बारीक होऊ लागले. क्रिस्टल पुढे म्हणाली की, जिमला गेल्यावर मला जास्त भूक लागायची. आता मला भूक लागत नाही. म्हणून मी बारीक झाले.
वर्कफ्रंटवर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, क्रिस्टल लवकरच वेब सीरिज फर्स्ट कॉपीमध्ये दिसणार आहे. ही मालिका जूनमध्ये एमएक्स प्लेअरवर प्रदर्शित होणार आहे. या मालिकेत क्रिस्टलसोबत मुनावर फारुकी दिसणार आहे. चाहते क्रिस्टलला नवीन शैलीत पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत.