Join us

टीव्हीच्या या अभिनेत्रीला अभिनयापासूनच वाटायची भीती? जाणून घ्या काय होते यामागे कारणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2017 16:49 IST

अभिनय हा काहीजणांना रक्तातच असतो.दृष्टी धामीलाही अशीच एक उत्तम कलाकार आहे.ती उगाच ओढून ताणून अभिनय करत कलाकरा बनलेली नाही. ...

अभिनय हा काहीजणांना रक्तातच असतो.दृष्टी धामीलाही अशीच एक उत्तम कलाकार आहे.ती उगाच ओढून ताणून अभिनय करत कलाकरा बनलेली नाही. तर अभिनय हा तिच्या रक्तात आहे असे बरेच जण तिला सांगतात. विशेष म्हणजे जिला आपल्या प्रत्येक नव्या भूमिकेद्वारे प्रेक्षकांची मने जिंकण्याची कला अवगत झाली आहे. ‘परदेस में है मेरा दिल’ या नव्या मालिकेत नैना बात्राची भूमिका अप्रतिमपणे रंगविल्याबद्दल सध्या तिचे खूप कौतुकही होत आहे. तिच्या या नवीन भूमिकेवरही रसिक इतके भरभरून प्रेम करत आहेत त्यामुळे ती रसिकांचे आभारही मानायला विसरत नाही.काही महिन्यांपूर्वी तिने लग्न केेले त्यामुळे काही दिवसांसाठीच दृष्टीने टीव्ही मालिकांमधून ब्रेक घेतला होता. तिची मॅरिड लाईफ सेट झाल्यानंतर ती पुन्हा एकदा टीव्ही मालिकांकडे वळली. मात्र लग्नापूर्वीची बेधडक दृष्टीत या ब्रेकमुळे थोडा फरत पडला होता. कोणत्याही भूमिकेला होकार देण्यापूर्वी दृष्टी त्या भूमिकेता खूप विचार करू लागली. मिळालेली भूमिका योग्य आहे किंवा नाही अशा अनेक गोष्टींमुळे तिला खूप दडपण जाणवते असल्याचे खुद्द दृष्टीनेच सांगितले होते. “अचानक ब्रेक घेत्यामुळे  मी अभिनय करण्यास विसरले असल्याच्या भावनेने मला पछाडलं होतं आणि त्यामुळे मला काम करणं जमणार नाही, या भीतीमुळे मला रडायला येत होतं,” असे दृष्टीने सांगितले. छोट्य़ा पडद्यावरील तिचा करिष्मा आणि तिच्यातील अभिनयगुण पाहता नव्या, चांगल्या भूमिकेपासून तिला वंचित ठेवण्यात काहीच अर्थ नव्हता.एकता कपूरने स्वत:‘परदेस मै है मेरा दिल’ मधील नैनाची भूमिका देऊ केल्याने दृष्टीचा  आनंद गगनात मावत नव्हता. पण चित्रीकरणासाठी घराबाहेर पडून सेटवर जाणे आणि परत घरी येणे, या नव्या दिनचर्येने तिच्या मनात सुरुवातीला काहीशी धास्ती निर्माण केली. “नव्या मालिकेत काम करताना सुरुवातीला मी खूपच धास्तावलेली असते. मग आठवडाभरानंतर मला त्या भूमिकेची सवय होते आणि मग मला वाटतं की मी या भूमिकेसाठीच जन्माला आले आहे,” असे द्रष्टी सांगते.