Join us  

दुसऱ्या लग्नानंतर वर्षभरातच मोडणार संसार? दलजित कौरचं पतीशी बिनसलं? घटस्फोटाच्या चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2024 9:53 AM

६ वर्षांत मोडला पहिला संसार, आता वर्षभरातच दुसऱ्या पतीसह बिनसलं; प्रसिद्ध अभिनेत्री घेणार घटस्फोट?

टीव्ही अभिनेत्री दलजीत कौर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली होती. दलजितने गेल्याच वर्षी बॉयफ्रेंड निखिल पटेलसह विवाह करत दुसऱ्यांदा संसार थाटला होता. पण, आता त्यांच्यात बिनसल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे वर्षभरातच दलजित आणि निखिलमधील नात्यात दुरावा आल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. दलजितने इन्स्टाग्राममधील बायोमधून पतीचं आडनाव काढून टाकल्यानंतर या चर्चा सुरू झाल्या आहेत. 

दलजितने २०२३मध्ये केनियामध्ये फायनान्स सेक्टरमध्ये काम करणाऱ्या निखिल पटेलसह लग्न केलं होतं. एक वर्ष डेट केल्यानंतर त्यांनी लग्नाच्या बेडीत अडकण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण, आता वर्षभरातच त्यांच्याच दुरावा आला आहे. दलजितने इन्स्टाग्रामवरुन निखिलचं आडनाव हटवण्याबरोबरच त्याच्याबरोबरचे फोटोही डिलीट केले आहेत. लग्नानंतर दलजित लेकाला घेऊन नवऱ्याबरोबर परदेशात स्थायिक झाली होती. पण, काही दिवसांपूर्वीच तिला मुंबईत स्पॉट करण्यात आलं. त्यामुळे दलजित आणि निखिलच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. 

दलजित तिच्या आईवडिलांच्या सर्जरीसाठी मुंबईत आल्याचं तिच्या टीमकडून सांगण्यात आलं आहे. त्यानंतर ती  एका वेब सीरिजचं शूटिंगही सुरू करणार असल्याचं सांगितलं जात आहे. दलजितने २००९ साली बिग बॉस फेम अभिनेता शालिन भनौतशी लग्न करत संसार थाटला होता. लग्नाच्या ६ वर्षांनी घटस्फोट घेत ते एकमेकांपासून वेगळे झाले. दलजितने शालिनवर अनेक गंभीर आरोपही केले होते. त्यांना एक मुलगाही आहे. 

शालिनपासून वेगळं झाल्यानंतर दलजित मुलाचा एकटीच सांभाळ करत होती. त्यानंतर मार्च २०२३मध्ये तिने निखिलशी विवाह करत दुसऱ्यांदा संसार थाटला. पण, आता वर्षभरातच तिचं दुसरं लग्नही मोडणार असल्याच्या चर्चा आहेत. 

टॅग्स :दलजीत कौरटिव्ही कलाकार