Join us  

कुणीतरी येणार गं...! वहिनीसाहेबांकडे गोड बातमी; धनश्री होणार आई

By रूपाली मुधोळकर | Published: October 11, 2020 3:55 PM

अनोखा व्हिडीओ शेअर करत धनश्री काडगावकरने शेअर केली गूड न्यूज

ठळक मुद्दे‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’मुळे धनश्रीला ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर ती ‘गंध फुलांचा गेला सांगून’, ‘जन्मगाठ’ या मालिकांमध्ये झळकली.

‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेतील वहिनी साहेब अर्थात नंदिता वहिनींची भूमिका साकारणारी अभिनेत्री धनश्री काडगावकर हिच्यावर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होतोय. बातमीही तशीच ‘गोड’ आहे. होय, धनश्री लवकरच आई होणार आहे.  एक अनोखा व्हिडीओ शेअर करत खुद्द धनश्रीने ही माहिती दिली. या व्हिडीओत धनश्री काडगावकर आणि तिचा पती दुर्वेश देशमुख दिसत आहेत. आईबाबा होणार असल्याची गुडन्यूज त्यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांशी शेअर केली आहे.  ‘कुणीतरी येणार गं..., ही गोड बातमी शेअर करण्यासाठी पतीच्या वाढदिवसाहून अधिक चांगला दिवस कोणता असू शकतो, असे तिने  व्हिडीओ शेअर करताना लिहिले आहे.

व्हिडीओच्या सुरुवातीला  धनश्री एका शेतात उभी दिसते. मग चिंचा, आवळे चाखताना दिसते. यानंतर तिचा पती दुर्वेश व्हिडीओत दिसतो. बाळाच्या आगमनाची चाहुल लागल्यावर स्त्रीचे आयुष्य बदलते. हे बदल या व्हिडीओत नेमकेपणाने टिपले आहेत. हा अनोखा व्हिडीओ पाहिल्यानंतर आणि इतकी गोड बातमी ऐकल्यानंतर चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. धनश्रीचा पती दुर्वेश व्यवसायाने इंजिनिअर आहे.

कोरोना काळात धनश्री व तिच्या पतीने प्री-प्रेग्नंसी फोटोशूट केले. शिवाय हा अनोखा व्हिडीओही तयार केला. मात्र यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली गेली.  व्हिडिओ शूट करताना मोजक्या लोकांची उपस्थिती होती. महत्वाची गोष्ट म्हणजे मेकअप करता आलेल्यांपासून ते अगदी कॅमेरामनपर्यंत सा-यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती.

‘तुझ्यात जीव रंगला’मधील वहिनीसाहेब या भूमिकेमुळं धनश्री काडगांवकरचा प्रचंड मोठा चाहता वर्ग तयार झाला आहे.मालिकेत तिची निगेटीव्ह भूमिका असली तरी आपल्या खास अंदाजात तिने ही भूमिका साकारली होती. तिच्या भूमिकेला रसिकांचीही भरघोस पसंती मिळाली होती. तिचा मालिकेतील अल्लडपणा रसिकांना चांगलाच भावला होता.

‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’मुळे धनश्रीला ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर ती ‘गंध फुलांचा गेला सांगून’, ‘जन्मगाठ’ या मालिकांमध्ये झळकली. ‘झोपी गेलेला जागा झाला’आणि ‘आधी बसू मग बोलू’ या नाटकांमधून धनश्रीने काम केले आहे. ब्रेव्हहार्ट  आणि  चिठ्ठी चित्रपटातही धनश्रीने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलाय.  

धनश्री काडगावकरचा ग्लॅमरस अंदाज तुम्ही पाहिला का ?, सोशल मीडियावर शेअर केला खास फोटो

'तुझ्यात जीव रंगला'मधील नंदिता वहिनी खऱ्या आयुष्यात आहे खूप ग्लॅमरस, पहा तिचे फोटो

टॅग्स :धनश्री काडगावकर