Join us  

"तू भेटशी नव्याने...", सुबोध भावेनं मालिकेच्या लूकमधील मिरर सेल्फी केला शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 4:23 PM

Subodh Bhave : 'तू भेटशी नव्याने' या मालिकेत सुबोध मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेत त्याच्यासोबत ‘राजा राणीची गं जोडी’ फेम अभिनेत्री शिवानी सोनार मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने विविधांगी भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. तो लवकरच छोट्या पडद्यावर कमबॅक करतो आहे. सोनी मराठीवर लवकरच दाखल होणाऱ्या तू भेटशी नव्याने या मालिकेत सुबोध मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेत त्याच्यासोबत ‘राजा राणीची गं जोडी’ फेम अभिनेत्री शिवानी सोनार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नुकतेच सुबोधने मालिकेतील लूकमधील मिरर सेल्फी शेअर केला आहे.  सुबोध भावेने तू भेटशी नव्याने या मालिकेतील मेकअप रुममधील आरशासमोर काढलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने   कॅप्शनमध्ये तू भेटशी नव्याने...असे लिहिले आहे. त्याच्या या पोस्टला पसंती मिळत आहे. चाहते कमेंटमध्ये मालिकेत त्याला पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगत आहे. 

या मालिकेत सुबोध भावेच्या दोन व्यक्तिरेखा पाहायला मिळत आहेत. अभिमन्यू आणि माही अशी त्या व्यक्तिरेखांची नावं आहेत. ऐन चाळीशीतील अभिमन्यू सर कॉलेज प्रोफेसरच्या भूमिकेत दिसणार आहेत तर ऐन विशीतला तरुण सुबोधही या मालिकेत दिसणार आहे. त्या व्यक्तिरेखेचं नाव माही आहे आणि AI च्या माध्यमातून हा तरुण सुबोध दाखविला जाणार आहे.

AI चा वापर करून या मालिकेतील व्यक्तिरेखा साकारली जाणार असल्याने ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेमुळे मालिका जगतात वेगळीच चर्चा निर्माण झाली आहे. २५ वर्षांपूर्वीचा सुबोध आणि आत्ताचा सुबोध अशा व्यक्तिरेखा दिसणार आहेत आणि ही एक प्रेमकथाही आहे. यामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरेल यात शंका नाही.

टॅग्स :सुबोध भावे