Join us  

मोठ्या थाटात झाला तितीक्षाचा सासरी गृहप्रवेश; Unseen video आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 10:53 AM

Titeeksha tawde: तितीक्षा सून म्हणून घरी आल्याचा आनंद सिद्धार्थच्या आईच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता.

यंदाच्या वर्षात अनेक लोकप्रिय मराठी कलाकारांनी लग्नगाठ बांधली. मुग्धा वैशंपायन, शिवानी सुर्वे, पूजा सावंत यांसारख्या सेलिब्रिटी पाठोपाठ लोकप्रिय अभिनेत्री तितीक्षा तावडे (Titeeksha Tawde) हिने सुद्धा सिद्धार्थ बोडके (Siddharth Bodke) याच्यासोबत लग्नगाठ बांधली. या लग्नाची कलाविश्वात बरीच चर्चा रंगली. अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. यामध्येच आता तिच्या गृहप्रवेशाचा व्हिडीओ समोर आला आहे.

२३ फेब्रुवारी रोजी तितीक्षाने सिद्धार्थसोबत लग्न केलं. या लग्नसोहळ्यातील हळद, मेहंदी, संगीत अशा प्रत्येक कार्यक्रमाचे फोटो, व्हिडीओ तितीक्षाने चाहत्यांसोबत शेअर केले होते. त्यानंतर आता तिने तिच्या गृहप्रवेशाचा व्हिडीओ शेअर केला आहे. तितीक्षाचं युट्यूब चॅनेल असून या चॅनेलवर तिने व्हिडीओ शेअर केला आहे.

तितीक्षाने शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात मोठ्या थाटामाटात तिचं सासरी स्वागत झाल्याचं दिसून येत आहे. लग्नाची वरात, उखाणा, गृहप्रवेश असं सारं काही या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. इतकंच नाही तर तितीक्षा सून झाल्याचा आनंद सिद्धार्थच्या आईच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत आहे.

टॅग्स :तितिक्षा तावडेटेलिव्हिजनटिव्ही कलाकार