Join us

बॉलिवूडपासून दुरावलेली ही अभिनेत्री दिसणार 'बिग बॉस १८' मध्ये, कोण आहे ती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2024 17:18 IST

Bigg Boss 18 : सलमान खानचा 'बिग बॉस १८' सुरू होण्यासाठी अजून २ महिने बाकी आहेत, मात्र निर्मात्यांनी यासाठी सेलिब्रिटींशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. मात्र, अद्याप कोणाच्याही नावाला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

सलमान खान(Salman Khan)चा 'बिग बॉस १८' (Bigg Boss 18) सुरू होण्यासाठी अजून २ महिने बाकी आहेत, मात्र निर्मात्यांनी यासाठी सेलिब्रिटींशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. मात्र, अद्याप कोणाच्याही नावाला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. दरम्यान, असेही वृत्त आहे की, बॉलिवूड अभिनेत्री समीरा रेड्डी (Sameera Reddy) 'बिग बॉस १८'मध्ये सहभागी होऊ शकते. या नव्या सीझनसाठी निर्मात्यांनी तिच्याशी संपर्क साधला आहे.

या वर्षी ऑक्टोबरपासून बिग बॉस १८ सुरू होणार असल्याच्या बातम्या येत आहेत. 'बिग बॉस ओटीटी ३' मध्ये सलमाम खानला होस्ट म्हणून न पाहिल्यामुळे चाहते नाराज झाले होते. तेव्हापासून ते त्यांच्या आवडत्या हिरोला पाहण्यासाठी नवीन सीझनची वाट पाहत आहेत. 'बिग बॉस १८'साठी आत्तापर्यंत अनेक सेलिब्रिटींच्या नावांची चर्चा होत आहे. आता त्यांच्यासोबत समीरा रेड्डी यांचेही नाव जोडले गेले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, समीरा रेड्डीला याआधीही 'बिग बॉस'ची ऑफर अनेकदा आली होती, पण काही कारणांमुळे ती सलमानच्या शोचा भाग होऊ शकली नाही. इतकेच नाही तर समीरा रेड्डीचे लहानपणापासूनच सलमानवर क्रश होते, याचा खुलासा तिने एका मुलाखतीत केला. अशा परिस्थितीत समीराला सलमानच्या शोमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली तर ती ती जाऊ देणार नाही. असो, समीरा रेड्डी गेल्या ११ वर्षांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. एका दशकाहून अधिक काळ तिने एकही हिंदी चित्रपट केलेला नाही. अशा परिस्थितीत ती 'बिग बॉस १८' चा भाग बनू शकते.

या सेलिब्रिटींची नावं चर्चेत आहेत'बिग बॉस'शी संबंधित सर्व माहिती देणाऱ्या 'द खबरी'च्या ट्विटनुसार, 'बिग बॉस १८'चा प्रीमियर सप्टेंबरच्या अखेरीस किंवा ऑक्टोबर २०२४ च्या सुरुवातीला होऊ शकतो. कलर्स वाहिनीवर त्याचे प्रसारण होणार आहे. असेही वृत्त आहे की निर्मात्यांनी नवीन सीझनसाठी अनेक नामांकित सेलिब्रिटींशी संपर्क साधला आहे. ज्या सेलिब्रिटींची नावे चर्चेत आहेत त्यात अर्जुन बिजलानी, फैजल शेख, कृतिका मलिक आणि दलजीत कौर यांची नावे आहेत. 

टॅग्स :समीरा रेड्डीबिग बॉस