Join us

पार्टीमध्ये बॉयफ्रेंडसह लंडन ठुमकदा गाण्यावर थिरकली नायरा, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2017 16:53 IST

पार्टीमध्ये ग्लॅमरस अंदाजात आपल्या आवडीच्या गाण्यांवर मनसोक्त थिरकताना कलाकारांना आपण पाहतो.त्यांचे फोटोही सोशल मीडियावर खुद्द टीव्ही कलाकारच शेअर करत ...

पार्टीमध्ये ग्लॅमरस अंदाजात आपल्या आवडीच्या गाण्यांवर मनसोक्त थिरकताना कलाकारांना आपण पाहतो.त्यांचे फोटोही सोशल मीडियावर खुद्द टीव्ही कलाकारच शेअर करत असल्यामुळे ते चाहत्यापर्यतही याची खबर लागते. मग या पार्टीत त्यांनी कोणता ड्रेस परिधान केला होता, हेअर स्टाइल कशी केली होती किंवा मग एरव्ही फक्त ट्रेडिशनल लूकमध्येच झळकत असलेली अभिनेत्री एकदम ग्लॅमरस अंदाजात दिसली की मग बातच न्यारी. सध्या ये रिश्ता क्या कहला है मालिकेतील लव्ह बर्ड म्हणजेच नायरा (शिवांगी जोशी) तिचा ऑनस्क्रीन पतीची भूमिका साकारणारा कार्तिक (मोहसिन खान) सह या पार्टीत पाहायला मिळाली.ऑनस्क्रीन नायरा आणि कार्तिक यांचा रोमँटीक अंदाज रसिकांची पसंती मिळवत असून रिअल लाईफमध्ये ही दोघे एकमेकांना डेट करत आहेत. पार्टीत नायर(शिवांगी) कार्तिक(मोहसिनसह) पार्टीत लंडन थिरकदा या गाण्यांवर थिरकताना पाहायला मिळाली. या दोघांचेही ऑफस्क्रीन रोमँटीक फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.विशेष म्हणजे या पार्टीत मोहसिन शिवानीच खूप काळजी घेताना दिसला.यावेळी मोहसिन आणि शिवानीच नाहीतर ये रिश्ता क्या कहलाता है मालिकेची संपूर्ण टीम उपस्थित होती.यावेळी नायरा मिनी स्कर्टमध्ये खूपच चार्मिंग दिसत होती. तर मोहसिनही डॅशिंग लूकमध्ये दिसला.'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेच्या सेटवर सध्या प्रेमाची जादू पाहायला मिळत आहे. लव्ह इज इन द एअर अशीच काहीशी परिस्थिती सेटवर निर्माण झाल्याच्या खुमासदार चर्चा सध्या रंगल्या आहेत. नायरा आणि कार्तिक यांची रिल लव्ह स्टोरी आता रियल लाइफमध्येही सुरु झाल्याचं बोललं जात आहे. नायराची भूमिका साकारणारी अभिनेत्री शिवांगी जोशी आणि कार्तिकची भूमिका साकारणारा मोहसिन खान यांच्यात सध्या रियल लाइफ लव्ह स्टोरी रंगत असल्याचं पाहायला मिळत आहे. दोघांच्या प्रेमाच्या गोष्टी चांगल्याच रंगल्या असताना याच मालिकेतील आणखी एक जोडीची प्रेमाच्या नात्यात बुडाल्याचं बोललं जात आहे. 'ये रिश्ता क्या कहेलाता है' या मालिकेत नक्ष ही भूमिका साकारणारा अभिनेता रिषी देव आणि मोहेना सिंग यांच्यात प्रेमाचं नातं जडू लागलं आहे. दोघंही एकमेकांना पसंत करत असून बराच काळ एकत्र घालवत आहेत. दोघांमधील हे प्रेमाचं नातं दिवसेंदिवस आणखी घट्ट बनत चाललं आहे. निव्वळ मैत्री या शब्दांपलीकडे या दोघांच्या नात्याकडे पाहिलं जात आहे. रिषी आणि मोहेना यांच्यातील या प्रेमाच्या नात्याची आणि दोघंही एकत्र बराच काळ घालवत असल्याची कल्पना मालिकेच्या सेटवरही प्रत्येकाला कल्पना आलीच आहे. एकमेकांसाठी खूप स्पेशल असल्याची कबूली दोघांनीही दिली आहे. असं असलं तरी आपण फक्त आणि फक्त चांगले मित्र असल्याचे हे दोघं सांगत आहे. मोहेना ही खूप स्पेशल आणि खास आहे. एक उत्तम सहकलाकार म्हणून तिच्यासोबत काम करायला मज्जा येते आणि आपण फक्त चांगले मित्र आहोत असं रिषीने सांगितले आहे. हिंदी मालिकांमध्ये सध्या वगेवगळ्या मालिका सुरू आहेत.त्यात जुन्या मालिका बंद होत त्या जागी नवीन मालिकांनी छोट्या पडद्यावर एंट्री घेत रसिकांचे मनोरंजन करत आहेत.नवीन मालिकांच्या भाऊगर्दीत एकच हिंदी मालिका आहे जीला रिप्लेस करणे नवीन मालिकांनाही शक्य झाले नाही. होय,ती मालिका म्हणजे 'ये रिश्ता क्या कहलाता है' गेल्या 8 वर्षापासून ही मालिका रसिकांचे तुफान मनोरंजन करत आहे.मालिकेची कथा आणि मालिकेची स्टारकास्ट यामुळे या मालिकेने अल्पावधीतच रसिकांची मनं जिंकली होती.आता या मालिकेने तब्बल 2500 एपिसोडस पूर्ण करत हिंदी मालिकांमध्ये सगळ्यांत सर्वाधिक काळ सुरू असणारी मालिका ठरली आहे.