Join us

या कारणांमुळे छोट्या पडद्यावर केले कमबॅक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2016 10:51 IST

संध्या मृदलला साचेबध्द पद्धीतीच्या कामात अडकायचे नव्हते म्हणून ती इतकी वर्ष  टीव्ही मालिकांपासून दूर राहिली  छोट्य़ा पडद्यावर पुनरागमन केलेल्या ...

संध्या मृदलला साचेबध्द पद्धीतीच्या कामात अडकायचे नव्हते म्हणून ती इतकी वर्ष  टीव्ही मालिकांपासून दूर राहिली  छोट्य़ा पडद्यावर पुनरागमन केलेल्या संध्या सध्या ‘पीओडब्ल्यू- बंदी युध्द के’  मालिकेत मिळालेल्या भूमिकेमुळे खूप आनंदात आहें.मालिकेत नाझनीन खानची जबरदस्त व्यक्तिरेखा आणि मालिकेची कथा-संकल्पना खूप आवडली.“मालिकांची निवड करताना, कथा काय आहे,याला आपण खूपच महत्त्व देत असल्याचे संध्या सांगते. या मालिकेत तिने इमान खानची पत्नी नाझनीन खान हिची व्यक्तिरेखा साकारली आहे. याविषयी संध्या सांगते, “मी ज्या मालिकेत किंवा चित्रपटात भूमिका स्विकारते तिची कथा उत्कृष्ट असली पाहिजे,यावर माझा कटाक्ष असतो. त्यानुसारच ही मालिका स्विकारली. सिनेमाप्रमाणेच आता मालिकांमध्ये स्त्रीप्रधान भूमिकेला महत्त्व दिले जात आहे. एरव्ही फक्त सासू - सूनेच्या भूमिकेपर्यंतच मर्यांदित राहणा-या महिला कलाकारांना आता मालिकेत योग्य ते महत्त्व दिले जात आहे.“प्रेक्षकांची आवडही आता  बदलली असल्याने महिला कलाकारांना अॅक्शन किंवा बिंधास्त भूमिकेत पाहणे प्रेक्षकांनाही आवडत असल्याचे पाहायला मिळत असल्याचे मत संध्या मृदुलाने व्यक्त केले. भूमिकेप्रमाणेच माझ्यासाठी मालिकेची कथाही खूप महत्त्वाची आहे.मी केवळ अभिनय करायचा म्हणून कोणत्याही मालिकेत किंवा चित्रपटात काम करत  नाही. माझ्यासाठी अभिनय ही केवळ करिअर नसून ती पूजा आहे- मी त्याच्याशी प्रतारणा करू शकत नसल्याचेही संध्या म्हणाली.”निखिल अडवाणी यांच्यासारखे दिग्दर्शक आणि महेश भट यांच्यासारखे निर्माते आता मालिकांच्या क्षेत्राकडे वळल्याने टीव्ही मालिकांच्या कथांचा दर्जा वाढला आहे. आता त्यांच्यासारखेच इतर अनेक जाणकार दिग्दर्शक टीव्ही मालिकांकडे वळतील आणि उत्तम कथानक असलेल्या मालिकांची निर्मिती करतील, अशी आशा आहे.”