Join us  

सर्वोत्कृष्ट बालकलाकारासाठी परी आणि आर्यामध्ये होणार टक्कर; कोण मारेल या पुरस्कारांमध्ये बाजी?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2021 6:21 PM

Zee marathi awards nominations: यंदाच्या झी मराठी अवॉर्ड्स’मध्ये माझी तुझी रेशीमगाठ आणि तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेतील दोन बालकलाकारांमध्ये टक्कर पाहायला मिळणार आहे.

ठळक मुद्देया दोघींपैकी हा पुरस्कार कोणाला मिळणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

झी मराठीवरील मालिकांचा आणि कलाकारांचा गौरव करणारा सोहळा म्हणजे झी मराठी अवॉर्ड्स. दरवर्षी हा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडतो. यावर्षी देखील हा सोहळा उत्साहात आणि आनंदात संपन्न होणार आहे. कारण, यावर्षी 'नव्या नात्यांच्या बंधू गाठी' म्हणत झी मराठीच्या परिवारात अनेक नवीन मालिका आणि कलाकारांचा समावेश झाला आहे. या नवीन मालिका आणि कलाकारांनी कमी कलावाधीत प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. त्यामुळेच यंदाच्या झी मराठी अवॉर्ड्स’मध्ये कोणते कलाकार बाजी मारणार हे पाहण्याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. 

यंदाच्या झी मराठी अवॉर्ड्स’मध्ये 'माझी तुझी रेशीमगाठ'मधील परी आणि 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' या मालिकेतील आर्या या दोन बालकलाकारांमध्ये टक्कर पाहायला मिळणार आहे. या दोघींनाही झी मराठी अवॉर्डमध्ये सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून नॉमिनेशन मिळालं आहे. त्यामुळे या दोघींपैकी हा पुरस्कार कोणाला मिळणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. विशेष म्हणजे त्यांच्यासोबतच अन्यही काही बालकलाकारांना नॉमिनेशन मिळालं आहे. मात्र, या दोघींमध्ये काटे की टक्कर आहे अशी प्रतिक्रिया प्रेक्षकांमधून उमटत आहे.

या चिमुकल्यांना मिळालं आहे सर्वोत्कृष्ट बालकलाकारासाठी नॉमिनेशन

आर्या - तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!परी - माझी तुझी रेशीमगाठदुम्न्या - तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!पिकुचु - माझी तुझी रेशीमगाठ 

टॅग्स :झी मराठीटेलिव्हिजनसेलिब्रिटी