Join us  

'होणार सून मी ह्या घरची'मधील गोंडस ओवी आता दिसते अशी!, जाणून घ्या तिच्याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2022 7:00 AM

'होणार सून मी ह्या घरची' (Honar Soon Mi Hya Gharchi) या मालिकेला खूप लोकप्रियता मिळाली होती. या मालिकेतील सर्व पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.

छोट्या पडद्यावर २०१३ साली प्रसारीत झालेली होणार सून मी ह्या घरची ही मालिका खूप लोकप्रिय झाली होती. या मालिकेतील श्री आणि जान्हवीची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच भावली होती. तसेच या मालिकेतील बालकलाकार ओवी आठवतेय ना. तिने आपल्या गोंडस आणि निरागस अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले होते. तिला उत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कारही मिळाला होता. सध्या ओवी काय करते हे अनेकांना जाणून घ्यायचे आहे.

होणार सून मी ह्या घरची मालिकेत ओवीची भूमिका बालकलाकार क्रितीना वर्तकने साकारली होती. क्रितीना एक मॉडेल असून अनेक व्यावसायिक जाहिराती तसेच एक बालकलाकार म्हणून मराठी चित्रपट, मराठी- हिंदी मालिकेत ती झळकली आहे. शशांक केतकर सोबत इथेच टाका तंबू या आणखी एका मालिकेत काम केले आहे. तर कनिका, द शैडो या सिनेमात तिने प्रमुख भूमिका केल्या आहेत. हिरवी या मराठी सिनेमातही ती झळकली आहे.

याशिवाय गोठ, डर, गर्ल्स ऑन टॉप, सावधान इंडिया, लक्ष्य, शपथ, जोधा अकबर अशा अनेक हिंदी आणि मराठी मालिकेत तिने काम केले आहे.क्रितीना सध्या कलर्स मराठी वाहिनीवरील जय जय स्वामी समर्थ या मालिकेत काम करत आहे. या मालिकेतून ती चंदाची सावत्र बहीण म्हणून एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळत आहे.

टॅग्स :शशांक केतकरतेजश्री प्रधान