Join us  

नोरा फतेही स्टेजवर आली आणि टेरेन्स चक्क मलायकाला विसरला..., पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2021 11:45 AM

India’s Best Dancer 3 : होय, ‘इंडियाज् बेस्ट डान्सर 3’च्या मंचावर नेमकं हेच घडलं. नोरा गेस्ट बनून शोमध्ये आली आणि शोचा जज व कोरिओग्राफर टेरेन्स लुइस अक्षरश: तिच्यात हरवला.

बॉलिवूडची डान्सिंग क्वीन नोरा फतेही  (Nora Fatehi) चाहत्यांच्या हृदयावर राज्य करते. तिचा हॉट आणि बोल्ड लूक चाहत्यांना अक्षरश: वेड लावतो. तिच्या बेली मुव्ह, तिचा डान्स पाहताना सगळेच मंत्रमुग्ध होतात. कोरिओग्राफर टेरेन्स लुइस (Terence Lewis) हाही याला अपवाद नाही. नोरा समोर आली आणि टेरेन्स तिच्यात असा काही हरवला की, तो मलायका अरोरा सुद्धा विसरला.होय, ‘इंडियाज् बेस्ट डान्सर 3’च्या  ( India’s Best Dancer 3) मंचावर नेमकं हेच घडलं. नोरा गेस्ट बनून शोमध्ये आली आणि शोचा जज व कोरिओग्राफर टेरेन्स लुइस अक्षरश: तिच्यात हरवला.याचा एक प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये नोरा फतेहीला स्टेजवर पाहून टेरेन्स जोरात तिचं स्वागत करतो. नोराला पाहून क्षणात टेरेन्सच्या चेह-यावरचा नूर बदलतो.

‘वेलकम बॅक नोरा’, असं उत्सुक होत तो म्हणतो. यावर तिचं वेलकम करायला मनीष आहे, असं म्हणत शोची जज गीता कपूर त्याला मध्येच डिवचते.  पुढच्या सीनमध्ये नोरा फतेही जबरदस्त बेली डान्स करताना दिसते. नोराचा डान्स पाहून टेरेन्स नि:शब्द झाल्याचा दिसतो. टेरेन्सला पाहून गीता कपूर पुन्हा त्याला डिवचते. ‘अहो, तोंड बंद करा काका’, असं ती म्हणते आणि सगळीकडे खसखस पिकते. यानंतर टेरेन्स नोराला स्टेजवरून आणण्यासाठी स्टेजवर जातो. तेव्हा गीता पुन्हा कमेंट करते.‘अरे टेरेन्स तू मलायकाला विसारलास का?’, असं गीता म्हणते. टेरेन्स बिचारा चक्क लाजतो.तुझा ड्रेस पाहून मी इतका विचलित झालो की मी तुझ्याकडे पाहतच राहिलो, असं तो नोराला म्हणतो. तेव्हाच मलायका अरोरा नोरालाही गमतीगमतीत डिवचतं. तू टेरेन्सला मिस करते का ? असं ती विचारते. यावर, ‘ऑफकोर्स मी त्याला मिस केले. टेरेन्ससोबत नाचताना खूप छान वाटतं. टेरेन्स नोराचे आभार मानत तिचा हात पकडतो आणि इकडे गीता व मलायका एकमेकांचा हात धरतात. यावरून सर्वजण टेरेन्सला चांगलंच चिडवतात. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

टॅग्स :नोरा फतेहीमलायका अरोरा