तेजश्रीची कोकण ट्रीप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2016 06:41 IST
कोकणातील अथांग समुद्र, नारळाची झाडे, नीरव शांतता अशा निसर्गरम्य वातावरणात वेळ घालवायला कोणाला नाही आवडणार. ...
तेजश्रीची कोकण ट्रीप
कोकणातील अथांग समुद्र, नारळाची झाडे, नीरव शांतता अशा निसर्गरम्य वातावरणात वेळ घालवायला कोणाला नाही आवडणार. कोकणातील याच अॅटमॉस्पिअरचा आनंद घेण्यासाठी रोजच्या कामातून, शुटिंग शेड्युल्स मधुन स्वत:साठी वेळ काढुन अभिनेत्री तेजश्री प्रधान कोकण ट्रीपला गेली आहे. कलाकार त्यांच्या कामात, शुटिंगमध्ये किती बिझी असतात हे तर आपल्याला माहितीच आहे. कामातील तणाव दुर करण्यासाठी मग मस्त लाँग हॉलिडेवर जाण्याची दुसरी मजा त्यांच्यासाठी नाही. तेजश्रीची नूकतीच एक टिव्ही मालिका संपली असल्याने ती सध्या कोकणात ट्रीप एन्जॉय करण्यासाठी गेली असावी. कोकणातील निसर्ग आणि शांतता तिला आवडत असल्याचे ती सांगते. समुद्रकिनारी, नारळांच्या झाडांसोबत फोटो काढण्याचा आनंदही तेजश्रीने या ट्रीपमध्ये घेतला आहे. तेजश्रीचे चाहते तिचे कोकणातील फोटो पाहुन तिला नक्कीच म्हणतील एन्जॉय युअर हॉलिडे.