तारक मेहताच्या माधवी भाभीचा हटके लूक !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2016 19:37 IST
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेने घराघरातील प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. नुकतेच या मालिकेने २ हजार ...
तारक मेहताच्या माधवी भाभीचा हटके लूक !
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेने घराघरातील प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. नुकतेच या मालिकेने २ हजार एपिसोड पूर्ण केले आहेत. या मालिकेतील महत्त्वाच्या भूमिकेंपैकी तारक मेहताच्या माधवी भाभी म्हणजे सोनालिका जोशी यांच्या बाबत जाणून घेणार आहोत. सोनालिकाने नुकतेच एक फोटोशूट केले होते, त्यात ती बीडी ओढताना दिसते आहे. मालिकेत नेहमी साडीत दिसणा-या सोनालिका जोशीने काही दिवसांपूर्वी एक ग्लॅमरस फोटोशूट करुन घेतले होते. या फोटोशूटच्या एका पोजमध्ये सोनालिकाच्या हातात सिगारेट दिसत असून तिचे केसरचनाही नेहमीपेक्षा वेगळी दिसतेय. तिचा हा लूक नक्कीच लक्ष वेधून घेणारा आहे.सोनालिका ही एक मराठी अभिनेत्री असून तिचा जन्म ५ जून, १९७६ ला महाराष्ट्रात झाला होता. तिने करिअरची सुरवात मराठी नाटकांमधून केली होती. त्याशिवाय सोनालिका अनेक मराठी चित्रपटांतूनही दिसली आहे. अनेक जाहिरातींमधूनही तिने काम केले आहे. वैयक्तीक जीवनात सोनालिका अत्यंत धार्मिक आहे. तिच्या पतीचे नाव समीर जोशी तर मुलीचे नाव आर्या आहे.