Join us  

अरे बापरे...! 'तारक मेहता' फेम बबीताला येतात अश्लील मॅसेज, असे देते उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 7:15 PM

बबीताची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे आणि ट्रोलदेखील होते.

सोनी सब वाहिनीवरील 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील सर्व पात्रांनी रसिकांच्या मनात घर केले आहे. प्रेक्षकांच्या पसंतीमुळे ही मालिका गेल्या अकरा वर्षांपासून मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. या मालिकेत बबीताची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे आणि ट्रोलदेखील ती होते. ती ट्रोलर्स कशी प्रत्युत्तर देते, हे तिने सांगितले. 

मुनमुन दत्ता सोशल मीडियावर सक्रीय आहे आणि ती प्रत्यक्षात खूप बोल्ड आहे.

ती सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते. ती नेहमी प्रत्येक मुद्द्यावर सोशल मीडियावर आपले मत मांडत असते. त्यामुळे तिला अनेकदा ट्रोल केले जाते. टाईम्स नाऊच्या रिपोर्टनुसार, एका मुलाखतीत मुनमुनने सांगितले की, स्टॉकर्स आणि ट्रोलर्संना सडेतोड उत्तर देत तिने माझ्यापासून दूर रहा, असे ठणकावून सांगितले.

तिने पुढे सांगितले की, मी माझ्या कोणत्याच फोटोवर कुणालाही वाईट आणि घाणेरडे कमेंट करू देत नाही. अनेकदा फोटो पोस्ट केल्यावर कमेंट सेक्शन बंद करावा लागतो. जर कुणी फॉलोअर निगेटिव्ह आणि फालतू कमेंट करत असेल तर ती त्याला चांगल्या प्रकारे समजावून सांगते आणि जर ऐकले नाही तर थेट त्यांना ब्लॉक करून टाकते. 

इतकेच नाही तर मुनमुनला अनेकदा अश्लील मॅसेज व फोटोशॉप फोटोंचा सामना करावा लागला होता. अशावेळी तिने पोलिसांचीही मदत घेतली आहे. मुनमुन अशा लोकांना सडेतोड उत्तर देते.

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मासोनी सब