Join us  

​चक्रव्यूह या मालिकेतील संगीता घोष आणि महिमा मकवाणीच्या लूकची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2017 8:58 AM

चक्रव्यूह या मालिकेत प्रेक्षकांना नारायणी शास्त्री, महिमा मकवाणा आणि संगीता घोष प्रमुख भूमिकेत दिसत आहे. नारायणी, संगीत आणि महिमा ...

चक्रव्यूह या मालिकेत प्रेक्षकांना नारायणी शास्त्री, महिमा मकवाणा आणि संगीता घोष प्रमुख भूमिकेत दिसत आहे. नारायणी, संगीत आणि महिमा या तिघीदेखील खूपच चांगल्या अभिनेत्री आहेत. या तिन्ही अभिनेत्री एकत्र झळकणार असल्याने प्रेक्षकांना या मालिकेविषयी चांगलीच उत्सुकता आहे. या मालिकेतील कलाकारांचा लूकदेखील खूपच वेगळा आहे. संगीता आणि महिमा यांच्या लूकवर तर या मालिकेच्या टीमने खूपच मेहनत घेतली आहे. महिमा मकवाणाने आतापर्यंत बालिकावधू, सपने सुहाने लडकपन के, अधुरी कहानी हमारी, दिल की बाते दिल ही जाने यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. या सगळ्याच मालिकांमध्ये प्रेक्षकांना तिचा ग्लॅमरस लूक पाहायला मिळाला आहे. पण चक्रव्यूह या मालिकेत प्रेक्षकांना महिमाचे एक वेगळे रूप पाहायला मिळणार आहे. यात ती शिवभक्ताची भूमिका साकारणार असून तिच्या डोक्यावर जटासंभार असणार आहे.महिमासोबतच संगीता घोषचा या मालिकेतील लूकदेखील वेगळा असणार आहे. संगीता घोष या मालिकेत एका नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. ती एका ग्लॅमरस रूपात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तिची व्यक्तिरेखा ही एका बंगाली स्त्रीची आहे. संगीता ऐश्वर्या रायची मोठी चाहती आहे. देवदास या चित्रपटात ऐश्वर्या एका बंगाली स्त्रीच्या रूपात प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. संगीताची चक्रव्यूह या मालिकेतील वेशभूषा ही ऐश्वर्याच्या देवदास या चित्रपटातील वेशभूषेसारखी असणार आहे.ऐश्वर्याच्या सौंदर्यावर संगीता फिदा आहे. त्यामुळे तिची चक्रव्यूह या मालिकेतील वेशभूषा ही ऐश्वर्यासारखी असणार हे तिला ज्यावेळी सांगण्यात आले, त्यावेळी तिने लगेचच देवदासमधील तिच्या साडीसारखीच साडी मागवली. संगीताचा मालिकेतील लूक हा ऐश्वर्यासारखा असल्याने सध्या ती खूप खूश आहे.