प्रत्येकाकडे एक लपलेली प्रतिभा असते आणि ती नकळत कधीतरी दुनियेसमोर ओळखली जाते. नुकतेच नीला फिल्म प्रोडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत ‘तारक मेहता का उलटा चष्माच्या’ सेटवर झालेल्या शूटच्या वेळी जेठालालची भूमिका साकारणाऱ्या दिलीप जोशी यांच्या समवेत असेच काहीसे घडले.
सध्या शोच्या चालू भागांमध्ये गोकुळधाम सोसायटीतील प्रत्येकजण चंपक लाल हरवल्याची चिंता करीत आहेत म्हणून जेठालाल आपल्या सासूचा सल्ला घेण्यासाठी तिला फोन करतात तेव्हा त्या जेठालालना राम नाम जपण्यास सुचवितात.
दया यांच्या आईने सांगितल्याप्रमाणे, गोकुळधाम सोसायटीचे रहिवासी सोसायटी कम्पाउंडमध्ये ढोलक आणि टाळ घेऊन जमतात. भिडे आणि इतर रहिवासी टाळ वाजवत असताना, जेठालाल ढोलक वाजवतात आणि तेव्हाच त्यांची ढोलक वाजविण्याची प्रतिभा सर्वांचे लक्ष वेधून घेते.