Join us
Daily Top 2Weekly Top 5

'20 दिवसांत वजन कमी करायला सांगितलं, इंजेक्शन घ्यावे लागले अन्', 'तारक मेहता...'च्या 'बावरी'चा पुन्हा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2023 12:23 IST

तारका मेहतामधील 'बावरी' नावाने लोकप्रिय झालेली अभिनेत्री मोनिका भदोरिया हिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत काही धक्कादायक खुलासे केले आहेत.

तारक मेहता का उल्टा चष्मा ही लोकप्रिय मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांना खळखळून हसवत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून शो वादातच अडकला आहे. पडद्यामागे बरंच काही घडत असून अनेक जुन्या कलाकारांनी मालिका सोडली आहे. शो सोडून गेलेल्या बऱ्याच जणांनी निर्मांत्यावर आरोप केले आहेत. शैलेश लोढा, जेनिफर मिस्त्री, मोनिका भदोरिया अशा काही कलाकारांनी निर्माते असित मोदींवर गंभीर आरोप केले आहेत. आता मालिकेतून 'बावरी' नावाने लोकप्रिय झालेली अभिनेत्री मोनिका भदोरिया(Monika Bhadoriya) हिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत काही धक्कादायक खुलासे केले आहेत. 

२० दिवसांत वजन कमी करण्याचे दिले अल्टिमेटम मोनिका भदोरियाचे वक्तव्य गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार, अभिनेत्रीने आता खुलासा केला आहे की तिला 20 दिवसांत वजन कमी करण्यास सांगितले होते.अभिनेत्रीने सांगितले की, सोहेल रमाणीने तिला ऑफिसमध्ये बोलावले होते. तो ऑफिसमध्ये नव्हता आणि एक अकाउंटंट होता ज्याने तिला सांगितले की ती गरोदर दिसत आहे आणि तिचं लग्न झालेले नाही हे कळल्यावर त्याला धक्काच बसला. मोनिकाला आठवते की ती आधीच शॉकमध्ये होती आणि जेव्हा सोहेल आला तेव्हा त्याने तिला 20 दिवसांत वजन कमी करण्याचा अल्टिमेटम दिला.

मोनिका भदोरियाने सांगितले की, वजन कमी करण्यासाठी तिला प्रोफेशनची मदत घ्यायला सांगितली आणि यासाठी तिला पैसे देण्यात येतील. पण अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, रमानी यांनी नकार दिला. जेव्हा तिने स्वतः वजन कमी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती आजारी पडली आणि व्हिटॅमिनची कमतरता झाली. मोनिकाने सांगितले की, त्यावेळी तिची तब्येत बिघडली आणि तिला खूप वेदनादायक इंजेक्शन्स घ्यावी लागली. 20 दिवसांनंतर, अभिनेत्रीला त्याला कॉल करायचा होता. दरम्यान, ती महिनाभरानंतर घरी गेली आणि दोन-तीन महिन्यांनी परतली. मात्र त्यादरम्यान त्यांनी एकदाही फोन घेतला नाही. मोनिका भदोरियाचा दावा आहे की, हे सर्व आपल्यावर टार्चर करण्यासाठी करण्यात आले.

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍माटिव्ही कलाकार