Join us  

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : प्रेक्षकांना मिळणार गुड न्यूज... दिशा वाकानी परतणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2019 5:56 PM

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील दयाबेन ही भूमिका तर प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेमुळे दिशा वाकानीला प्रचंड लोकप्रियता मिळाली. 

ठळक मुद्देदया या मालिकेत परत कधी येईल याची सगळेजण आतुरतेने वाट पाहात आहेत. त्यामुळे ही व्यक्तिरेखा लवकरच प्रेक्षकांना मालिकेत पाहायला मिळणार आहे. दिशा परत येण्याची शक्यता खूपच जास्त आहे. पण त्याचसोबत आम्ही काही अभिनेत्रींशी देखील या भूमिकेबाबत चर्चा करत आहोत.

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेचे नुकतेच 2700 भाग पूर्ण झाले आहेत. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा आता प्रेक्षकांना त्यांच्यातील एक वाटू लागल्या आहेत आणि त्यातही या मालिकेतील दयाबेन ही भूमिका तर प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेमुळे दिशा वाकानीला प्रचंड लोकप्रियता मिळाली. 

आज प्रेक्षक दिशाला दयाबेन म्हणूनच ओळखतात. दिशा वाकानी गेल्या अनेक महिन्यांपासून मालिकेतून गायब आहे. दिशाने गेल्या वर्षी एका गोंडस मुलीला जन्म दिला. दिशा गरोदर असताना देखील मालिकेचे चित्रीकरण करत होती. पण आता तिची मुलगी लहान असल्याने ती मालिकेपासून गेल्या कित्येक महिन्यांपासून दूर आहे. प्रेक्षकांची लाडकी दयाबेन म्हणजेच दिशा वाकानी मालिकेत केव्हा परतेल याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात होते. पण आता दिशा या मालिकेचा भाग नसून दयाबेन या व्यक्तिरेखेसाठी नव्या कलाकाराचा शोध सुरू असल्याचे या मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. या कार्यक्रमासाठी काही अभिनेत्रींनी ऑडिशन दिल्याची देखील चर्चा होती. पण टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार, असित कुमार मोदी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले आहे की, दया या मालिकेत परत कधी येईल याची सगळेजण आतुरतेने वाट पाहात आहेत. त्यामुळे ही व्यक्तिरेखा लवकरच प्रेक्षकांना मालिकेत पाहायला मिळणार आहे. दिशा परत येण्याची शक्यता खूपच जास्त आहे. पण त्याचसोबत आम्ही काही अभिनेत्रींशी देखील या भूमिकेबाबत चर्चा करत आहोत.

आता दया या भूमिकेत प्रेक्षकांना दिशालाच पुन्हा एकदा पाहायला मिळतेय की, या मालिकेत दिशाची जागा दुसरी कोण अभिनेत्री घेतेय हे लवकरच कळेल. 

दयाच्या भूमिकेसाठी ऑडिशन्स सुरू असून पापडपोल या मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या अॅमी त्रिवेदीला दयाच्या भूमिकेसाठी विचारण्यात आले असल्याचे म्हटले जात आहे.  

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मादिशा वाकानी