Join us
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये फॅन्सना आठवली तारक मेहता का उल्टा चष्माची दिशा वाकानी, व्हायरल झाले बेबी शॉवरचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 14:34 IST

सध्या सोशल माडियावर तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील दयाबेन म्हणजेच दिशा वाकानीच्या बेबी शॉवरचे फोटो व्हायरल झाले आहेत.

ठळक मुद्देदिशा वाकानीच्या ओटीभरणाला तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. एवढेच नव्हे तर या मालिकेतील तिचा ऑनस्क्रीन मुलगा टप्पू देखील या कार्यक्रमासाठी आर्वजून आला होता.

अख्ख्या देशात कोरोनाने हैदोस घातला आहे. देशातही कोरोनाचा प्रकोप वाढत असताना सगळीकडे दहशतीचे वातावरण आहे. खबरदारी म्हणून भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केला आहे. त्यामुळे २१ दिवस देशातील सगळेच कामकाज ठप्प झाले आहे. त्यामुळे सध्या अनेक लोक त्यांच्या घरातच कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहेत. सोशल मीडियावर तर लोक या काळात चांगलेच सक्रिय झाले आहेत. या दरम्यान सोशल माडियावर तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील दयाबेन म्हणजेच दिशा वाकानीच्या बेबी शॉवरचे फोटो व्हायरल झाले आहेत.

दिशा वाकानीच्या ओटीभरणाला तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. एवढेच नव्हे तर या मालिकेतील तिचा ऑनस्क्रीन मुलगा टप्पू देखील या कार्यक्रमासाठी आर्वजून आला होता. या मालिकेत भाव्या गांधीने टप्पूची भूमिका साकारली होती. सात-आठ वर्षं तो या मालिकेचा भाग होता. पण गेल्या वर्षी त्याने या मालिकेला रामराम ठोकला. त्याने ही मालिका सोडली असली तरी त्याचे या मालिकेच्या टीमसोबतचे नाते खूपच चांगले आहे. 

दिशा वाकानी या मालिकेत भाव्याच्या आईच्या भूमिकेत होती. त्यामुळे भाव्या आणि दिशाचे नाते खऱ्या आयुष्यात देखील एखाद्या मुला-आई प्रमाणेच आहे. आज भाव्या या मालिकेत नसला तरी त्याचे दिशासोबतचे बाँडिंग कायम आहे आणि त्यामुळेच त्याने आपल्या या ऑनस्क्रीन आईच्या ओटीभरणाला आवर्जून उपस्थिती लावली होती. त्या दोघांनी त्यावेळी एक क्यूटसा फोटो देखील काढला होता. हाच फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दिशा अनेक मालिकांमध्ये छोट्या भूमिकांमध्ये झळकली होती. पण तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील दयाबेन या भूमिकेने तिला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळवून दिले. ती मालिकेत परत कधी येणार याची तिचे फॅन्स आतुरतेने वाट पाहात आहेत.

टॅग्स :दिशा वाकानीतारक मेहता का उल्‍टा चश्‍मा