Join us  

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ने मला सेलिब्रिटी बनवले नाही तर...; ‘अंजली भाभी’ने सांगितले शो सोडण्याचे कारण

By रूपाली मुधोळकर | Published: October 03, 2020 8:00 AM

नव्या अंजली भाभीसोबत मालिका मार्गी लागली. पण मालिका सोडण्यावरूनच सुरु असलेले आरोप-प्रत्यारोप मात्र संपायचे नाव नाही.

ठळक मुद्देनेहाने याआधीही ‘तारक मेहताचे उल्टा चष्मा’च्या मेकर्सवर काही आरोप केले होते. तिच्या या आरोपांना शोचे निर्माते असित मोदी यांनी उत्तर दिले आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ची अंजली भाभी कधीच बदलली. होय, अंजली भाभीची भूमिका साकारणारी नेहा मेहता हिने मालिका सोडली आणि तिने मालिका सोडताच तिच्या जागी सुनैना फौजदार हिची वर्णी लागली. नव्या अंजली भाभीसोबत ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिका मार्गी लागली. पण मालिका सोडण्यावरूनच सुरु असलेले आरोप-प्रत्यारोप मात्र संपायचे नाव नाही.  ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये काम करत होती, म्हणून मी सेलिब्रिटी बनली नाही. तर मी एक सेलिब्रिटी होते म्हणून मी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये काम करत होते, असे नेहा मेहताने आता म्हटलेय. 

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा शो अचानक सोडण्यामागचे कारण नेहाने एका ताज्या मुलाखतीत सांगितले. तिने सांगितले, आता थांबायलाच हवे, इथपर्यंत मी आले होते. मला अनेकांनी शो न सोडण्याचा सल्ला दिला. पण मी ठाम होते. कारण करायचे तर कर नाही तर सोड, असे मला सेटवर स्पष्टपणे बजावण्यात आले होते. तू काम करणार नसशील तर आमच्याकडे रिप्लेसमेंट तयार आहे, असेही मला वारंवार सांगण्यात आले. मग मी शो सोडणेच योग्य समजले. मी या फिल्डमध्ये खूप काम केले आहे.‘तारक मेहता का उल्टा चष्मा’आधीही अनेक शोमध्ये भूमिका साकारल्या आहेत. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मुळे मी सेलिब्रिटी झाले नाही. तर मी सेलिब्रिटी होते म्हणून मी या शोमध्ये दिसले. मला माझा सन्मान अधिक महत्त्वाचा वाटतो. मी शांत राहिले, संयम ठेवला. पण एका क्षणाला मला हा निर्णय घ्यावाच लागला, असेही नेहा म्हणाली.

मी निगेटीव्हीटी पसरवत नाही...नेहाने याआधीही ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या मेकर्सवर काही आरोप केले होते. तिच्या या आरोपांना शोचे निर्माते असित मोदी यांनी उत्तर दिले आहे. नेहाने आधीही शो साडला होता. शोचे 100-200 एपिसोड झाले होते, तेव्हा ती शोमधून बाहेर पडली होती. यानंतर ती पुन्हा शोमध्ये परतली होती. तेव्हाही थोडा संयम ठेव,असेच मी तिला सांगितले होते. मी नकारात्मकता पसरवण्यावर विश्वास ठेवत नाही. तर सकारात्मकतेवर माझा विश्वास आहे. जे झाले ते झाले, मी झालेल्या गोष्टींची फिकीर करत नाही. टीमला खूश ठेवायचे हा माझा प्रयत्न असतो, असे असित मोदी म्हणाले.

ही आहे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ची नवी अंजली भाभी, ग्लॅमरस सुनैनाची होणार दमदार एन्ट्री

हा फालतुपणा थांबवा नाहीतर...! ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ची सोनू ‘मीम्स’मुळे त्रासली, असा दिला इशारा

 

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा