Join us

​स्वामी रामदेवः एक संघर्ष या मालिकसाठी नमन जैन वापरणार प्रोस्थेटिक्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2018 14:00 IST

राष्ट्रीय पुरस्कार विजेता नमन जैन स्वामी रामदेवः एक संघर्षमध्ये बाबा रामदेव यांच्या लहानपणाची भूमिका साकारणार आहे. आपली भूमिका अधिक ...

राष्ट्रीय पुरस्कार विजेता नमन जैन स्वामी रामदेवः एक संघर्षमध्ये बाबा रामदेव यांच्या लहानपणाची भूमिका साकारणार आहे. आपली भूमिका अधिक वास्तववादी आणि खरी वाटावी म्हणून तो सध्या चांगलीच मेहनत घेत आहे. १२ फेब्रुवारी २०१८ पासून डिस्कव्हरी जीत वाहिनीवर ही मालिका सुरू होणार असून या मालिकेत बाबा रामदेव यांच्या बालपणापासून ते आजपर्यंतचा त्यांचा प्रवास दाखवला जाणार आहे. या मालिकेची निर्मिती बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण करणार आहे. नमन या मालिकेसाठी प्रोस्थेटिकचा मेकअपचा वापर करत आहे.स्वामी रामदेवः एक संघर्षमध्ये बाबा रामदेव यांची व्यक्तिरेखा अचूकपणे साकारण्यासाठी नमन जैनने कठोर प्रशिक्षण घेतले आहे. या खास व्यक्तिरेखेला पडद्यावर जिवंत करण्यासाठी नमनने आपल्या देहबोलीत आणि संवादफेकीत देखील खूप बदल केले आहेत. या मालिकेतील नमनच्या लूकवर देखील प्रचंड मेहनत घेण्यात आली आहे. त्याच्या लूकवर काम करण्यासाठी एका खास टीमला आमंत्रित करण्यात आले आहे. त्याच्या मेकअपसाठी दररोज जवळजवळ तीन तास लागतात. याविषयी नमन जैन सांगतो, “स्वामी रामदेवः एक संघर्ष या कार्यक्रमाचा हिस्सा बनणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. टेलिव्हिजनवर लहानपणाचे स्वामी रामदेव साकारताना खूप छान वाटतंय. ही भूमिका बरीच आव्हानात्मक असल्यामुळे मी प्रचंड मेहनत घेत आहे. या व्यक्तिरेखेसाठी मी प्रथमच प्रोस्थेटिक मेकअपचा वापर केला आहे. त्याचबरोबर मला माझ्या तोंडात डेंचर्सही बसवावे लागायचे, ज्यामुळे अर्ध्या चेहऱ्याचा अर्धांगवायू झाल्यासारखे दिसेल. ती प्रक्रिया खूपच कठीण होती. पण प्रोस्थेटिक्ससोबत चित्रीकरण करण्याचा अनुभव वेगळा आणि छान होता. मला आशा आहे की प्रेक्षकांना हा शो आवडेल.” स्वामी रामदेवः एक संघर्ष ही एक बायोपिक मालिका असून यात स्वामी रामदेव यांचा अज्ञातवासातून एक नावाजलेले विख्यात योग गुरू, व्यवसाय अग्रणी आणि राष्ट्रीय आयकॉन बनण्यापर्यंतचा अद्‌भुत आणि प्रेरणादायी प्रवास रेखाटण्यात आला आहे. तसेच बाबांचे सहकारी बाळकृष्ण यांच्याही आयुष्याशी निगडीत अनेक घटनाही दाखवण्यात येणार आहेत. Also Read : माझ्याच वयाच्या ‘खलनायकांना’ वैतागून मी हिंदी सिनेमा सोडला- तेज सप्रू