‘इम्युनिटी’साठी स्वामी ओमने खेळला डाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2016 14:25 IST
बिग बॉसच्या घरात सर्वाधिक चर्चेत कुठले नाव असेल तर ते स्वयंघोषित बाबा स्वामी ओम हे आहेत. प्रत्येक एपिसोडमध्ये काही ...
‘इम्युनिटी’साठी स्वामी ओमने खेळला डाव
बिग बॉसच्या घरात सर्वाधिक चर्चेत कुठले नाव असेल तर ते स्वयंघोषित बाबा स्वामी ओम हे आहेत. प्रत्येक एपिसोडमध्ये काही ना काही कारनामा करणाºया स्वामी ओमच्या नावे सोमवारचा एपिसोड खूपच फायदेशीर ठरला. इम्युनिटीसाठी तब्बल दहा लाख रुपयांचा डाव खेळणाºया स्वामी ओमने नॉमिनेशन प्रक्रियेतून तब्बल दोन आठवडे स्वत:ला सेफ केले आहे. दर सोमवारी घरात नॉमिनेशनची प्रक्रिया पार पडत असते. मात्र यावेळेस बिग बॉसने नॉमिनेशन प्रक्रिया सुरू करण्याअगोदर स्वामी ओमला ‘कन्फेशन’ रूममध्ये बोलावले. बिग बॉसने ओमला इम्युनिटी जिंकण्याची एक संधी असल्याचे म्हणताच, त्यांनी लगेचच बिग बॉसला हात जोडत तुमची कुठलीही अट मान्य असल्याचे म्हटले. मात्र बिग बॉसने इम्युनिटी मिळविण्यासाठी विजेत्या रकमेतून दहा लाख रुपये वजा केले जाणार असल्याचे सांगत, विचार करून निर्णय घ्यावा, असे स्वामी ओमला सांगितले. मात्र त्यांनी तत्काळ निर्णय सांगत मला ही अट मान्य असल्याचे म्हटले. मी या घरात पैशांसाठी आलो नाही, मला फक्त बिग बॉसचा आशीर्वाद हवा आहे. या शोचा मीच विजेता असल्याचा दावाही त्यांनी पुन्हा केला. }}}} बिग बॉस आणि स्वामी ओममधील संभाषण घरातील अन्य सदस्यांनाही ऐकू येत असल्याने यावर प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक होते. जेव्हा स्वामी ओम कन्फेशन रूममधून बाहेर आले तेव्हा मनवीर त्यांच्यावर चांगलाच संतापला. मात्र लोपामुद्राने त्याची बाजू घेत कदाचित मला ही आॅफर दिली असती तर मीही हाच निर्णय घेतला असता, असे म्हटले. वास्तविक जेव्हा घरात पहिल्यांदा इम्युनिटीसाठी टास्क घेण्यात आला होता. तेव्हा स्वामी ओम सिक्रेट रूममध्ये होते. त्यांना या टास्कमध्ये सहभाग घेता आला नसल्यानेच त्यांना इम्युनिटी जिंकण्याची पुन्हा संधी दिली गेली. इम्युनिटी मिळविल्यामुळे स्वामी ओम पुढील आठवड्यासाठी घरात सुरक्षित आहेत.