सुयश रायचे रिश्ता लिखेंगे हम नया या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर पुनरागमन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2017 15:48 IST
सुयश रायने प्यार की ये एक कहानी, ये है आशिकी, एक था राजा एक थी राणी, पहरेदार पिया की ...
सुयश रायचे रिश्ता लिखेंगे हम नया या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर पुनरागमन
सुयश रायने प्यार की ये एक कहानी, ये है आशिकी, एक था राजा एक थी राणी, पहरेदार पिया की यांसारख्या मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. सुयशची पहरेदार पिया की ही मालिका चांगलीच वादात सापडली होती. या मालिकेत प्रेक्षकांना नऊ वर्षांचा रतन हर्षवर्धन सिंह म्हणजेच अफान खान आणि १८ वर्षांची मुलगी दिया म्हणजेच तेजस्वी वायंगणकर यांच्या असामान्य विवाहाची कहाणी पाहायला मिळाली होती. दिया आपल्या स्वतःच्या स्वप्नांचे बलिदान देऊन रतनच्या रक्षणार्थ त्याच्याशी विवाह करते अशी या मालिकेची कथा होती. एक लहान मुलगा आणि एक तरुण मुलगी यांच्यात प्रेमकहानी कशी असू शकते? असा सगळ्यांना प्रश्न पडला आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी या मालिकेच्या कथानकावर आक्षेप घेतला होता. त्यामुळे ही मालिका काही महिन्यांपूर्वी बंद करण्यात आली. पण आता याच मालिकेच्या टीमला घेऊन रिश्ता लिखेंगे हम नया ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. या मालिकेत आता प्रेक्षकांना सुयश रायला देखील पाहायला मिळणार आहे. या मालिकेद्वारे तो छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे.रिश्ता लिखेंगे हम नया या मालिकेत सुयश प्रेक्षकांना अभय कुंवर या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ही भूमिका अतिशय मनोरंजनात्मक असून अभयचे दियावर प्रेम आहे आणि त्याला तिच्यासोबत लग्न देखील करायचे आहे. सुयशने रिश्ता लिखेंगे हम नया या मालिकेच्या चित्रीकरणला सुरुवात देखील केली आहे. सध्या तो तेजस्वी प्रकाश आणि रोहित सुचंतीसह चित्रीकरण करत आहे. त्याच्या या मालिकेविषयी सुयश सांगतो, राजस्थानच्या एका राजघराण्यातील अभय कुंवरसिंह यांची भूमिका मी साकारत आहे. तो दियाच्या प्रेमात पडणार आहे असे प्रेक्षकांना मालिकेत पाहायला मिळणार आहे. माझे आवडते सह-कलाकार आणि टीमसह पुन्हा एकदा काम करायला मिळत असल्याचा मला प्रचंड आनंद होत आहे. या मालिकेतील माझी भूमिका खूपच इंटरेस्टिंग आहे. अभय हा खेळकर मनोवृत्तीचा दाखवण्यात आला आहे. प्रेक्षकांना ही भूमिका आवडेल याची मला खात्री आहे. Also Read : सुयश रायसोबत लग्न झाल्यानंतर अशाप्रकारे माझे आयुष्य बदलले असे सांगतेय किश्वर मर्चंट