Join us  

सुशांत सिंह राजपूतची बहिण श्वेता सिंहने अंकिताला दिला पाठिंबा, खास फोटो शेअर करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 12:14 PM

एका विशेष व्यक्तीने अंकिताला पाठिंबा दिला आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय वादग्रस्त शो 'बिग बॉस'  कायमच चर्चेचा विषय असतो. सध्या सोशल मीडियावरही 'बिग बॉस 17' चा गाजावाजा पहायला मिळतोय. दिवसेंदिवस शो अधिक रंजक होत चालला असून प्रेक्षक आपल्या आवडत्या स्पर्धकांना सपोर्ट करत आहेत. सोशल मीडियावर पोस्ट शेअर ते आपल्या आवडत्या स्पर्धकांना पाठिंबा देत आहेत. अशातच एका विशेष व्यक्तीने अंकिताला पाठिंबा दिला आहे.

ती व्यक्ती आहे, दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची बहीण (Sushant Singh Rajput’s sister) श्वेता सिंह कीर्ती. थेट सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) बहिणीने अंकिताला समर्थन दर्शवलं आहे.   श्वेता सिंहने सोशल मीडियावर अंकिताचा तिच्या आईसोबतचा फोटो शेअर केला. कॅप्शनमध्ये तिनं लिहलं, 'अंकिता आमचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तू खूप प्रामाणिकपणे खेळत असून कमाल आहेस'. श्वेताच्या या समर्थनामुळे सुशांत आणि अंकिताचे फॅन्स अगदीच भावूक झाले आहेत. 

अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंह राजपूत यांचं नातं किती घट्ट होतं याची झलक आजही पाहायला मिळते. बिग बॉसमध्ये अंकिता नेहमीच तिच्या आणि सुशांतच्या नात्याबाबत बोलत असते. अंकिताचा सुशांतच्या कुटुंबाशी ग्रेट बॉन्ड आहे. हे नातं इतकं घट्ट आहे की सुशांतच्या बहिणी राणी आणि श्वेता आजही तिला कॉल करतात.

सुशांतची बहिण श्वेता सिंहसह बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींचाही अंकिताला पाठिंबा आहे.  'बिग बॉस 17' या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा आता अंतिम टप्प्यात आला आहे. सध्या घरात अंकिता लोखंडे, विकी जैन, मुनव्वर फारुकी, आयशा खान,  ईशा मालवीय, मन्नारा चोप्रा, अरुण महाशेट्टी, अभिषेक कुमार हे स्पर्धक आहेत. यांच्यामध्ये तगडी लढाई असल्याचं दिसून येत आहे. प्रत्येक स्पर्धक जीव ओतून ट्रॉफी मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. आता बिग बॉसच्या घरातून कोण बाहेर पडणार आणि बिग बॉसची ट्रॉफी कोण उंचावणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

टॅग्स :अंकिता लोखंडेसेलिब्रिटीबॉलिवूडसुशांत सिंग