Join us

पत्रकाराच्या भूमिकेसाठी सुरुची अडारकरने घेतली 'ही' मेहनत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2019 08:00 IST

अभिनेत्री सुरुची अडारकर झी युवावरील 'एक घर मंतरलेलं' या मालिकेत एका पत्रकाराच्या भूमिकेत पाहायला मिळते आहे.

'का रे दुरावा' मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री सुरुची अडारकर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ती झी युवावरील 'एक घर मंतरलेलं' या मालिकेत एका पत्रकाराच्या भूमिकेत पाहायला मिळते आहे. 

'एक घर मंतरलेलं' या मालिकेत तिने गार्गी महाजनची भूमिका साकारली आहे. या मालिकेबद्दल ती म्हणाली की, 'ही मालिका इतर मालिकांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. ही गोष्ट आहे एका घराची. ही मालिका अतिशय रहस्यमय असून एक अनपेक्षित गूढ कथा या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. या मालिकेत मी गार्गी महाजनची व्यक्तिरेखा साकारते. जी एक उभरती पत्रकार आहे. ती खूप निडर आहे. एखाद्या गोष्टी मागचे सत्य जाणून घेण्याकडे तिचा कल असतो. सुरुवातीला ती एका न्यूज चॅनलमध्ये इंटर्न म्हणून कार्यरत आहे. तिचा जिज्ञासू स्वभाव तिला मृत्युंजय नावाच्या एका जुन्या घराकडे कसा खेचतो आणि ती कशा प्रकारे सर्व गोष्टींचा सामना करते हे सर्वया व्यक्तिरेखेद्वारे आपल्याला पाहायला मिळणार आहे.'सुरूचीने या भूमिकेच्या तयारीबद्दल सांगितले की, 'या भूमिकेसाठी मी काही वर्कशॉप अटेंड केले. तसेच आपण रोज न्यूज चॅनेल्स बघतो त्यात आपण पत्रकारांची विशिष्ट शैली देखील बघतो, त्यामुळे मी न्यूज चॅनल्स खूप पाहिले. रिपोटर्स कसे वागतात, बोलतात, साईट वरून कसे रिपोर्टींग करतात याचा देखील मी अभ्यास केला.'रिपोर्टर गार्गी महाजन ही खूप निडर आहे. 'एक घर मंतरलेलं'मधील घराचे एक रहस्य आहे आणि ते रहस्य काय आहे याचा शोध गार्गी लावणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना ही मालिका नक्कीच खिळवून ठेवेल ही खात्री असल्याचे सुरूचीने सांगितले.  

टॅग्स :झी युवा