सुरेखा कुडची दिसणार चाहुल २मध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2017 14:09 IST
सुरेखा कुडची या एक प्रसिद्ध अभिनेत्री असण्यासोबतच खूप चांगल्या नर्तिका देखील आहे. सुरेखा यांनी आजवर अनेक मराठी, हिंदी चित्रपट, ...
सुरेखा कुडची दिसणार चाहुल २मध्ये
सुरेखा कुडची या एक प्रसिद्ध अभिनेत्री असण्यासोबतच खूप चांगल्या नर्तिका देखील आहे. सुरेखा यांनी आजवर अनेक मराठी, हिंदी चित्रपट, मालिकांमध्ये काम केले आहे. भरत आला परत, तुच माझी राणी, सासुची माया, खुर्ची सम्राट, तीन बायका फजिती ऐका यांसारख्या चित्रपटांमध्ये त्या झळकल्या आहेत तसेच त्यांनी रुंजी आणि देवयानी या मालिकांमध्ये देखील महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. आता प्रेक्षकांना त्या एका नव्या मालिकेत पाहायला मिळणार आहेत.चाहुल २ या मालिकेत सुरेखा कुडची यांची लवकरच एंट्री होणार असून त्या वहिनीसाहेब ही व्यक्तिरेखा साकारणार आहेत. चाहुल या मालिकेचे नुकतेच नवे पर्व सुरू झाले आहे. या दुसऱ्या पर्वात प्रेक्षकांना अनेक नवे कलाकार पाहायला मिळणार आहेत.चाहुल या मालिकेच्या पहिल्या पर्वाच्या शेवटी प्रेक्षकांना शांभवी आणि सर्जा यांचे लग्न पाहायला मिळाले होते. पहिले पर्व संपल्यानंतर प्रेक्षकांना लगेचच आता दुसरे पर्व पाहायला मिळत आहे. या दुसऱ्या पर्वात अक्षर कोठारी, रेश्मा शिंदे मुख्य भूमिकेत आहेत. त्याचसोबत केतकी पालवही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. चाहुल मालिकेच्या पहिल्या पर्वात सर्जाला वाड्यामधील भुताने झपाटले असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले होते. त्यानंतर सर्जाच्या वडिलांचा म्हणजेच यशवंतचा मृत्यू झाला होता. या सगळ्या घटनांनी वाड्यामध्ये एकप्रकारची शांतता पसरली होती. या वाड्यात निर्मलाचे भूत फिरत असल्याचे आपल्याला पहिल्यापासूनच माहीत होते आणि या भूताला मात देण्यासाठी शांभवीने अनेक प्रयत्न केलेले होते. भोसले वाड्यात भूत असल्याने हा वाडा सोडून जाण्यास तिने सगळ्यांना तयार केले होते. तिचे ऐकून सगळेजण हा वाडा सोडून दुसऱ्या वाड्यात देखील राहायला गेले होते. पण त्या वाड्यावरदेखील निर्मला पोहोचली होती. ती सर्जाच्या प्रेमाखातर तिथे आली होती. पण मालिकेच्या शेवटी शांभवी आणि सर्जाच्या आयुष्यातील सगळ्या समस्या दूर होऊन त्यांचे लग्न झालेले प्रेक्षकांना पाहायला मिळाले. Also Read : चाहुलच्या दुसऱ्या पर्वात दिसणार केतकी पालव