Join us  

सुप्रिया पिळगांवकर दिसणार 'या' भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 3:57 PM

प्यार की एक ढिंचॅक कहानी आपल्या व्यक्तिरेखा आणि नवीनतम कथानकासह अगोदरच उत्साह निर्माण करत आहे. शिवांश सिंग ओबेरॉय नकुल मेहता आणि अदिती देशमुख मंजिरी पुपाला यांच्यासोबत ह्या मालिकेत मराठी अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकरसुद्धा दिसणार आहेत.

ठळक मुद्दे सुप्रिया पोलिस महाआयुक्तांची व्यक्तिरेखा साकारणार आहेत.

प्यार की एक ढिंचॅक कहानी आपल्या व्यक्तिरेखा आणि नवीनतम कथानकासह अगोदरच उत्साह निर्माण करत आहे. शिवांश सिंग ओबेरॉय नकुल मेहता आणि अदिती देशमुख मंजिरी पुपाला यांच्यासोबत ह्या मालिकेत मराठी अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकरसुद्धा दिसणार आहेत.

या शोमध्ये सुप्रिया पोलिस महाआयुक्तांची व्यक्तिरेखा साकारणार असून त्या शिवांश आणि अदिती यांच्या आयुष्यात मोठी भूमिका निभावतील. सुप्रिया म्हणाल्या, “इश्कबाजसारख्या दीर्घकाळ सुरू असलेल्या शोमध्ये काम करण्याबद्दल मी खूप उत्साहात आहे कारण मला नवीनच भूमिका साकारायला मिळत आहे आणि तीसुद्धा पोलिस महाआयुक्तांची. मला सैन्यातील महिलांबद्दल नेहमीच आदर वाटलेला असून त्यांच्या हातात खूप ताकद असते. या शोमध्ये माझ्या व्यक्तिरेखेला ह्या पोलिस अधिकाऱ्याच्या दोन्ही बाजू पाहायला मिळतील. ही खूपच वेगळी भूमिका आहेत त्यामुळे मला वाटतं फक्त अर्ध्या तासात मी ती स्वीकारली. मला आशा आहे प्रेक्षकांना माझा हा नवीन अवतार आणि माझा परफॉर्मन्स आवडेल.”

सुप्रिया यांनी ब्लफमास्टर आणि हिचकी तसेच नवरा माझा नवसाचा आणि टाईमपास आणि अनेक टेलिव्हिजन मालिकांमधून काम केले आहे. आता सुमारे २ वर्षांनंतर त्या टीव्हीवर पुनरागमन करत आहेत.

टॅग्स :सुप्रिया पिळगांवकर