आॅनस्क्रीन जोड्यांची सुपरहिट केमिस्ट्री....
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2016 02:08 IST
हिरो अन हिरोईन या दोनच शब्दांनी खºया अर्थाने सिनेमाला अर्थ प्राप्त होतो असे म्हणायला खरतर ...
आॅनस्क्रीन जोड्यांची सुपरहिट केमिस्ट्री....
हिरो अन हिरोईन या दोनच शब्दांनी खºया अर्थाने सिनेमाला अर्थ प्राप्त होतो असे म्हणायला खरतर काहीच हरकत नाही. सिनेमाचे नाव जरी घेतले तरी आपल्याला डोळ््यासमोर फक्त अभिनय, सौंदर्य,अदांनी प्रेक्षकांना घायाळ करुन पडद्यावर रोमान्स करणाºया हिरो-हिरोईनचीच जोडी दिसते. पुर्वीपासुनच हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीमध्ये या आॅनस्क्रीन जोड्यांनी रसिकांना मोहिनी घातली आहे. आपल्या आवडत्या जोडीला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चित्रपटांना गर्दी करणारे प्रेक्षक आजही पहायला मिळतात. सिनेमातील केवळ एका हिट जोडीमुळे थिएटर्सच्या बाहेर हाऊसफुल्लच्या पाट्या देखील झळकलेल्या आहेत. मराठी इंडस्ट्रीमध्ये अशा हिट जोड्यांची सध्या चलती असुन खास त्यांच्यासाठी चित्रपट पाहणाºया प्रेक्षकांची संख्या वाढत आहे. राज कपुर-नर्गिस, राजेश खन्ना- मुमताज, धर्मेंद्र- हेमा मालिनी, गोविंदा-करिष्मा,शाहरुख-काजोल या हिंदी चित्रपटसृष्टीतील फेमस आणि हिट जोड्यांनी अनेक चित्रपट गाजविले आहेत. अशाचप्रकारे मराठी इंडस्ट्रीत देखील दादा कोंडके-उषा चव्हाण, सचिन- सुप्रिया, अशोक सराफ- निवेदिता जोशी, लक्ष्मीकांत बेर्डे-प्रिया बेर्डे यांच्या जोड्यांना आॅनस्क्रीन पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असायचे. स्वप्निल जोशी- सई ताम्हणकर, अंकुश चौधरी- पुजा सावंत, उमेश कामत - प्रिया बापट,स्वप्निल जोशी-मुकता बर्वे, अमृता सुभाष- गिरीश कुलकर्णी या जोड्यांनीआजहीआपल्या आॅनस्क्रीन केमिस्ट्रीमुळे फॅन फॉलॉइंग वाढवली आहे. दुनियादारी मधील श्रेयस आणि त्याची शिरीन या दोघांमधील प्रेमाचे नाते स्वप्निल जोशी व सई ताम्हणकरने अतिशय हळूवार पणे उलगडले होते. दोघांची केमिस्ट्री या चित्रपटातून अफलातून जुळलेली दिसली. श्रेयसला प्रेमाने बच्चु म्हणणारी शिरीन सगळ््याच्याच मनावर अधिराज्य करुन गेली आणि त्यांची जोडी या चित्रपटातून सुपरहिट झाली. त्यानंतर दोघेही संजय जाधव दिग्दर्शित प्यार वाली लव स्टोरी या चित्रपटात झळकले. पुरेपुर रोमान्स अन अॅक्शनची जुगलबंदी असणाºया या सिनेमात सई-स्वप्निलची जोडी भाव खाऊन गेली. तुही रे.. या चित्रपटा देखील त्यांनी नवरा बायकोची भुमिका साकारुन, लग्नानंतरची प्रेमकथा रंगवली. सई-स्वप्निलची जोडी आज मराठीतील मोस्ट फेव्हरेट आॅनस्क्रीन कपल पैकी एक आहे. एवढेच नाही तर त्यांना मराठीतील शाहरुख-काजोल असेही म्हटले जाते. उमेश कामत- प्रिया बापट हे दोघे रिअल लाईफ कपल असले तरी त्यांनी रिल लाईफमध्ये आॅनस्क्रिन काम करुन त्यांच्या जोडीची मोहोर रसिकांच्या मनावर उमटविली आहे. टाईमप्लीज या सिनेमामध्ये उमेशच्या अल्लड बायकोची भुमिका प्रियाने साकारली होती. त्या सिनेमामधेच दोघांची केमिस्ट्री बहरुन आली होती. लग्नानंतर त्यांचा नवा गडी अन राज्य नवे हा सिनेमा प्रदर्शित झाला अन दर्शकांनी पुन्हा एकदा या जोडीला पसंती दर्शविली. असेच अजुन एक मॅरिड कपल म्हणजे आदिनाथ कोठारे अन उर्मिला कोठारे. दुभंग व अनवट या चित्रपटांतून हे दोघेही मोठ्या पडद्यावर एकत्र आले. या दोघांच्या जोडीला देखील प्रेक्षकांकडुन थम्प्सअप मिळाले. मुंबई-पुणे-मुंबई... मंगलाष्टक वन्स मोअर... मुंबई-पुणे-मुंबई २ ... या चित्रपटांतून घराघरांत पोहचलेली आणि सगळ््यांचीच लाडकी अशी जोडी म्हणजे मुक्ता बर्वे आणि स्वप्निल जोशी. मुंबई-पुणे-मुंबई या चित्रपटामध्ये या दोघांच्या भन्नाट ट्युनिंगला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले अन तो चित्रपट सुपरहिट झाला. त्यापाठोपाठच त्याचा दुसरा सिनेमा मंगलाष्टक वन्स मोअर आणि मुंबई-पुणे-मुंबई २ या चित्रपटांनी या दोघांच्या जोडीला अधिकच फेमस केले. अमृता सुभाष व गिरिष कुलकर्णी या जोडीने ग्रामीण बाज असलेले आणि प्रेक्षकांच्या मनाला थेट भिडणारे संवेदनात्मक सिनेमे केले आहेत. विहीर, वळू, मसाला, गंध या चित्रपटांतून ही जोडी पडद्यावर झळकली अन प्रेक्षकांच्या मनामध्ये त्यांनी आपली जागा काबीज केली. या जोडीने केलेले चित्रपट प्रेक्षकांशी रिलेट करीत असुन बºयाचदा त्यामध्ये आपल्याला आपलीच छबी दिसते. दोघांच्याही अभिनयातील ठसकेबाजपणा, संवादकौशल्य यामुळे मोठ्या पडद्यावर त्यांचे सीन्स अधिकच खुलुन दिसतात. प्रार्थना बेहेरे आणि वैभव तत्ववादी ही सध्याची हॉट जोडी म्हणुनच फेमस आहे. कॉफी आणि बरच काही, मि.अॅन्ड मिसेस सदाचारी या चित्रपटांमध्ये रोमान्स केल्यानंतर दोघेही एका आगामी चित्रपटात त्यांची ट्युनिंग दाखविण्यासाठी सज्ज झाले आहेत. अंकुश चौधरी व पुजा सावंत या दोघांनी जरी दगडी चाळ या एकाच चित्रपटामध्ये काम केले असले तरी त्यांच्या जोडीला चांगलेच हिट्स मिळाले आहेत. आॅनस्क्रीन दोघांची जोडी चांगलीच जमत असल्याची चर्चा होती. एवढेच नाही तर मराठीतील टॉलेस्ट जोडी म्हणुन या कपलकडे पाहण्यात येते. एकाच चित्रपटात काम केल्यानंतर सुद्धा या जोडीविषयी इतकी चर्चा होत आहे आणि त्यांना पसंत केले जात आहे. त्यामुळे आजकालचे चित्रपट हे त्यातील हिट जोड्यांमुळेच जास्त चालत आहेत असे म्हणणे वावगे ठरणार नाही.