Join us  

'Bigg boss' मुळे मला जीवे मारण्याची धमकी मिळाली; सनी लिओनीचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 7:22 PM

Sunny leone: सनीने बिग बॉसमध्ये सहभागी  होण्याचा निर्णय घेतल्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी मिळाली. याविषयी तिने नुकताच खुलासा केला आहे.

पॉर्न इंडस्ट्रीला कायमचा रामराम करुन बॉलिवूडकडे वळलेली अभिनेत्री म्हणजे सनी लिओनी. उत्तम फॅशनसेन्स असलेल्या सनीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर काही मोजक्या सिनेमांमध्ये काम केलं. सोबतच वादग्रस्त शो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्येही ती झळकली. विशेष म्हणजे सनीने बिग बॉसमध्ये सहभागी  होण्याचा निर्णय घेतल्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी मिळाली. याविषयी तिने नुकताच खुलासा केला आहे.

"मी बिग बॉसमध्ये सहभागी होणार हे लोकांना कळल्यानंतर सगळ्यांनी मोठ्या प्रमाणावर माझा विरोध केला होता. हा नकार इतक्या मोठ्या प्रमाणात होता की मी, माझ्या नवऱ्याला सांगितलं मला बिग बॉसमध्ये नाही जायचंय. भारतातले लोक माझा द्वेष करतात. या काळात बिग बॉसच्या निर्मात्यांचा मला वारंवार फोन येत होता. पण, कसं काय माहित नाही, मी या शोसाठी होकार दिला", असं सनी म्हणाली.

पुढे ती म्हणते, "मी बिग बॉससाठी होकार दिल्यानंतर अनेकांनी मला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. तरी पण मोठ्या हिमतीने मी या शोमध्ये सहभागी झाली. हा शो सुरु असतानाचा महेश भट्ट यांनी मला सिनेमाची ऑफर दिली. इतकंच नाही तर या शोमुळे लोकांची माझ्याकडे पाहायचा दृष्टीकोन बदलला.  लोकांनी मला चांगल्या नजरेने पाहायला सुरुवात केली".

दरम्यान, बिग बॉसच्या घरात असतानाच सनीला चित्रपटाची ऑफर मिळाली आणि तिचा बॉलिवूडमध्ये प्रवेश झाला. सध्या सनी तिच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल आयुष्यामुळेही चर्चेत येते. सनीने डॅनिअल वेबरसोबत लग्न केलं असून त्यांना  एक मुलगी आणि दोन मुलं असा परिवार आहे.

टॅग्स :सनी लिओनीसेलिब्रिटीटेलिव्हिजनबिग बॉस