इंडियाज असली चॅम्पियनच्या फिनालेत सुनील शेट्टी थिरकणार या गाण्यांवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2017 15:24 IST
इंडियाज असली चॅम्पियन... है दम हा आगळावेगळा कार्यक्रम प्रेक्षकांना पाहायला मिळात आहे. हा कार्यक्रम प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. हा ...
इंडियाज असली चॅम्पियनच्या फिनालेत सुनील शेट्टी थिरकणार या गाण्यांवर
इंडियाज असली चॅम्पियन... है दम हा आगळावेगळा कार्यक्रम प्रेक्षकांना पाहायला मिळात आहे. हा कार्यक्रम प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. हा कार्यक्रम सध्या अंतिम टप्प्यात असून प्रेक्षकांना लवकरच या कार्यक्रमाचा ग्रँड फिनाले पाहायला मिळणार आहे. प्रत्येक स्पर्धक या कार्यक्रमाचे विजेतेपद मिळवण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न घेत आहे. सगळेच स्पर्धक एकापेक्षा एक सरस असल्याने इंडियाज असली चॅम्पियन हा किताब कोण मिळवणार याची उत्सुकला प्रेक्षकांना देखील लागली आहे. इंडियाज असली चॅम्पियन या कार्यक्रमात परीक्षकांची भूमिका सुनील शेट्टी साकारत आहे. या कार्यक्रमातील सुनीलचे सूत्रसंचालन प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. या कार्यक्रमाच्या फिनालेला सुयोग्य बॉलिवूड स्टाइल ओळख देण्यासाठी सुनील शेट्टी सज्ज झाला आहे. तो या कार्यक्रमाच्या फिनालेला अनेक गाण्यांवर नृत्य सादर करणार आहे. 90च्या दशकात सुनीलची हाय हुक्कू, झांजरिया, शहर की लडकी यांसारखी गाणी प्रचंड गाजली होती. या हिट गाण्यांवर तो फिनालेला थिरकणार आहे. सुनीलने 90च्या दशकातील गाण्यांवर नृत्य सादर केल्याने कार्यक्रमाची टीमदेखील खूपच खूश झाली होती. त्यांना चित्रीकरण करताना खूपच धमाल आली. हा शो स्पर्धकांची शारीरिक आणि मानसिक परीक्षा पाहाणारा होता. त्यामुळे सुनीलने अशाप्रकारे डान्स फ्लोअरवर येऊन धमाल केल्याने मजा आली. त्याने 90च्या दशकात गाजलेल्या गाण्याच्या स्टेप्स सादर केल्यामुळे सगळ्या स्पर्धकांमध्येदेखील एक वेगळाच उत्साह संचारला होता. सुनील सरांच्या नृत्यामुळे आम्हाला एक वेगळीच एनर्जी मिळाली असल्याचे स्पर्धक सांगतात.इंडियाज असली चॅम्पियन... है दम या कार्यक्रमाचा फिनाले प्रेक्षकांना आवडेल अशी या टीमला खात्री आहे. Also Read : सुनील शेट्टीची पत्नी 'गिफ्ट आणि लाइफस्टाइल' स्टोरची आहे मालकिण!