Join us
Daily Top 2Weekly Top 5

कसा थांबवेल लतिका अभिमन्यूचा अपमान, 'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेत धक्कादायक वळण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2021 17:11 IST

'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेमध्ये अभिमन्यू आणि लतिकाच्या आयुष्यातील अडचणी कमी होण्याचं काही नावं घेत नाहीये. दोन कुटुंबात वाढत असलेल्या कटुतेचा परिणाम अभि आणि लतिकाच्या नात्यावर होताना दिसत आहे.

'सुंदरा मनामध्ये भरली' मालिका दिवसेंदिवस रंजक आणि रसिकांची लाडकी मालिका बनली आहे. मालिकेतील कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे आणि कथानकामुळे रसिकही मालिकेला खिळून आहेत.या मालिकेमुळे कलाकारांनाही अमाप लोकप्रियता मिळत आहे. सगळेच कलाकार रसिकांचे आवडते कलाकार बनले आहेत. मालिका आता रंजक वळणावर आली आहे. 

'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेमध्ये अभिमन्यू आणि लतिकाच्या आयुष्यातील अडचणी कमी होण्याचं काही नावं घेत नाहीये. दोन कुटुंबात वाढत असलेल्या कटुतेचा परिणाम अभि आणि लतिकाच्या नात्यावर होताना दिसत आहे. बापूंना सत्य कळताच त्यांनी त्यादिवसापासून  मुलीच्या प्रेमापोटी खोट्या संसारतून तिला बाहेर काढलं.

यासगळ्याची अभिमन्युला याची खूप मोठी शिक्षा भोगावी लागते आहे.लतिकाच्या कर्तृत्वाबद्दल तिचा मोठा सत्कार होणार आहे. आणि हा सत्कार अभिमन्यूच्या हस्ते पार पडणार आहे.पण,जमा झालेल्या बायकांनी अभिमन्यूविरुध्द आवाज उठवला. बायकोला साभार परत करणार असं म्हणून आता सत्कार कसा करणार आणि त्याच्या तोंडाला काळ फासण्यासाठी पुढे येतात.

एकीकडे लतिकाचा होणार सत्कार आणि दुसरीकडे अभिमन्यूवर ओढवलेले संकट नक्की काय होणार ? लतिका कसा थांबणार अभिमन्यूचा होणारा अपमान आगामी भागात रसिकांना या सगळ्या प्रश्नांची उत्तरं उलगडणार आहेत.