Join us  

‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेतल्या अभ्याची खऱ्या आयुष्यातली लतिका दिसते फारच सुंदर,हटके आहे लव्हस्टोरी !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 9:00 AM

अभिमन्यू म्हणजे आभ्या आणि लतिका यांची जोडी चाहत्यांना खूप आवडत आहे. अभिमन्यू ही भूमिका अभिनेता समीर परांजपे याने साकारली आहे. समीर परांजपेने या मालिकेआधीही विविध भूमिका साकारल्या आहेत.

‘सुंदरा मना मध्ये भरली’ मालिकेने अल्पावधीतच रसिकांची पसंती मिळवली. प्रत्येक व्यक्तीरेखा रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली आहे.  प्रत्येक व्यक्तीरेखेनं रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. मालिकेप्रमाणे कलाकाराही रसिकांचे आवडीचे बनले. त्यांच्याविषयी जाणून घेण्यात रसिकांचीही फार इच्छा असते. रिल लाईफप्रमाणे त्यांच्या रिअल लाईफमधल्या घडामोडी जाणून घेण्यातही चाहते फार उत्सुक असतात.

मालिकेतल्या सगळ्याच भूमिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरल्या असल्या तरी, अभिमन्यू आणि लतिका यांची जोडी चाहत्यांना खूप आवडते.अभिमन्यू ही भूमिका अभिनेता समीर परांजपे याने साकारली आहे. समीर परांजपेने या मालिकेआधीही छोट्या पडद्यावर विविध भूमिका साकारल्या आहेत. सिनेमातही तो झळकला आहे. ऑनस्क्रीन लतीकासोबत त्याची जोडी दाखवण्यात आली आहे अगदी त्याचप्रमाणे खऱ्या आयुष्यातली त्याची लतिकाही तितकीच सुंदर आहे.

अनुजासोबत त्याची जोडी जमली आहे. अनुजाही त्याची कॉलेज मैत्रीण आहे. त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि दोघांनीही २०१६ मध्ये लग्न करत आयुष्याची नवीन सुरुवात केली होती. यांचे लव्हमॅरेज आहे. विशेष म्हणजे दोघांनीही ११ वर्ष डेट केल्यानंतर लग्न केले होते.अनुजा एका खासगी कंपनीत नोकरी करते. काही महिन्यांपूर्वीच या कपलच्या आयुष्यात गोंडस परीचे आगमन झाले आहे. मुलगी झाल्याची गुड न्युजने समीरने शेअर करताच चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला होता.

सोशल मीडियावरही या दोघांचे फोटो पाहायला मिळतात.एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत कपल गोल देत असतात. दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून समीर चाहत्यांच्याही संपर्कात असतो. या मालिकेमुळे त्याच्या लोकप्रियतेतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. 

समीर हा फिटनेस फ्रिक आहे.'सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेमध्येसुद्धा त्याला फिटनेस फ्रिक दाखवण्यात आलं आहे. सतत एक्सरसाईज, रनिंग वेगेरे करताना दिसून येतो. रिअल लाईफमध्येही तो नित्यनियमाने वर्कआऊट करताना दिसतो. योग्य आहार आणि वर्कआऊट करत तो स्वतःला फिट ठेवतो. तसेच इतरांनाही फिटनेससाठी प्रेरणा देताना दिसतो.