Join us
Daily Top 2Weekly Top 5

19 वर्षीय सुंबूल तौकीर खानने वडिलांच्या दुसऱ्या लग्नावर सोडले मौन, आईबद्दल बोलताना म्हणाली....

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 11:56 IST

सुंबूलच्या वडिलांनी घटस्फोटित निलोफर यांच्याशी पुनर्विवाह केला आहे.

'बिग बॉस 16'ची स्पर्धक आणि टीव्ही अभिनेत्री सुंबूल तौकीर खान (Sumbul Touqeer Khan) सध्या तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. सुंबूल आपल्या कुटुंबासोबत अधिकाधिक वेळ घालवत आहे. अलिकडेच तिचं वडील तौकीर खान यांनी दुसरं लग्न केलं आहे. मेंहदीपासून ते लग्नापर्यंत सगळ्यापर्यंतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 

फोटोग्राफर विरल भयानी यांनी आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये सुंबुल तिच्या नव्या आईबाबत बोलताना दिसतेय. ती म्हणाली, माझं कुटुंब आधी आनंदी होते आणि पण आता ते अधिक आनंदी झाले असल्याचे त्यांनी सांगितले. मला खूप बरं वाटते की, माझं एक सामान्य कुटुंब आहे. पुढे, अभिनेत्रीने तिच्या धाकट्या बहिणीचेही कौतुक केले. आमच्या कुटुंबात एक लहान बहिणपण आणली आहे, तिला खूप त्रास देते पण खूप गोड आहे.

सुंबूलच्या कुटुंबासाठी ही ईद खूप खास होती. या ईदला अभिनेत्रीचे कुटुंब संपूर्ण झाले. अभिनेत्रीने आई नीलोफरसोबत ईद साजरी केली. सुंबुलच्या वडिलांनी बेगम नीलोफरचा फोटोही शेअर केला होता, ज्यामध्ये तिचा चेहरा दिसत नव्हता.

 सुंबूलच्या वडिलांनी घटस्फोटित निलोफर यांच्याशी पुनर्विवाह केला आहे, त्यांना पहिल्या लग्नापासून एक मुलगी देखील आहे, जी लग्नानंतर आता सुंबूलच्या कुटुंबासोबत राहते आहे. सुंबूल 6 वर्षांची असताना तिच्या आई वडिलांचा घटस्फोट झाला आणि तेव्हापासून वडिलांनी तिला सांभाळलं. तिच्या बहिणीनं तिचा सांभाळ केला. 'इमली' बनून घराघरात पोहोचलेली सुंबूल बिग बॉसमध्ये सर्वाधिक मानधन घेणारी स्पर्धक बनलेली.  बिग बॉसमध्ये सुंबुलचे नाव शालीन भानोतसोबत जोडले गेले होते.   

टॅग्स :टिव्ही कलाकार