Join us
Daily Top 2Weekly Top 5

'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतील जयदीपचा सख्खा भाऊदेखील आहे प्रसिद्ध अभिनेता, आहे खूप हॅण्डसम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2021 06:00 IST

फार कमी लोकांना माहित असेल की मंदारच्या खऱ्या आयुष्यातील सख्खा भाऊदेखील अभिनेता आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका सुख म्हणजे नक्की काय असतंने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील जयदीप म्हणजेच अभिनेता मंदार जाधव सध्या सगळ्यांचाच फेव्हरिट झाला आहे. त्याच्या भूमिकेचे सगळेच कौतुक करताना दिसत आहेत. मालिकेतील गौरी आणि जयदीपची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावते आहे. फार कमी लोकांना माहित असेल की मंदारच्या खऱ्या आयुष्यातील सख्खा भाऊदेखील अभिनेता आहे. 

जयदीप उर्फ अभिनेता मंदार जाधवचा सख्खा भाऊ हिंदी मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याचे नाव आहे मेघन जाधव. मेघनदेखील मंदार सारखा हॅण्डसम आहे. 

मेघन सध्या सोनी टेलिव्हिजनवरील मालिका विघ्नहर्ता गणेशमध्ये माधवदासची भूमिका साकारतो आहे. याशिवाय त्याने तेरा यार हू में, शुभारंभ, राधाकृष्ण, तेनाली रामा, महाकाली अंत ही आरंभ है, सीआयडी, क्राइम पेट्रोल आणि सावधान इंडिया अशा बऱ्याच मालिकेत काम केले आहे. तसेच त्याने काही चित्रपटातही काम केले आहे.

मंदार जाधवनेही अलादीन या हिंदी मालिकेत काम केले आहे. तसेच त्याची पत्नीदेखील अभिनेत्री आहे. तिचे नाव मितिका शर्मा जाधव आहे. तिने देवो के देव महादेव या मालिकेत काम केले आहे.

२०१६ साली मंदार आणि मितिकाने लग्न केले. त्यांना दोन मुले असून त्याचे नाव रिदान आणि रेहान असे आहे.

टॅग्स :स्टार प्रवाह