Join us

‘तीन पहेलिया’ एक थरारक मालिका सादर करण्यासाठी सुजय घोष सज्ज !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2018 11:33 IST

यंदाच्या उन्हाळ्याच्या मोसमात ‘स्टार प्लस’ आपल्या प्रेक्षकांसाठी एक थरारक मालिका घेऊन येत आहे. आपल्या प्रेक्षकांचे वैविध्यपूर्ण मनोरंजन करण्याच्या आपल्या ...

यंदाच्या उन्हाळ्याच्या मोसमात ‘स्टार प्लस’ आपल्या प्रेक्षकांसाठी एक थरारक मालिका घेऊन येत आहे. आपल्या प्रेक्षकांचे वैविध्यपूर्ण मनोरंजन करण्याच्या आपल्या ध्येयानुसार ‘स्टार प्लस’ने यावेळी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध  दिग्दर्शक सुजय घोष यांच्याशी सहकार्याचा करार केला आहे.'कहानी','टीन','कहानी-2 : दुर्गा रानी सिंह' यासारख्या रहस्यपटांचे दिग्दर्शन आणि पटकथाकार म्हणून सुजय घोष ओळखले जातात. आपल्या गूढ- रहस्यमय चित्रपटांसाठी विख्यात असलेले सुजय घोष ‘स्टार प्लस’वर तीन चित्रपट सादर करणार आहेत. हे तीन लघुपट ‘तीन पहेलिया’ या सार्थ नावाखाली रविवार, 22 एप्रिल रोजी सकाळी 10.00 वाजल्यापासून ‘स्टार प्लस’वरून प्रसारित केले जातील. गुडलक, मिर्ची मालिनी आणि कॉपी अशी या तीन लघुटांची नावे असून ते एकापाठोपाठ एक प्रसारित केले जातील.‘स्टार प्लस’शी असलेल्या आपल्या सहकार्या संदर्भात श्री. सुजय घोष म्हणाले, “‘स्टार प्लस’ने मला ही संधी दिल्याबद्दल मला आनंद होत आहे.नव्या पिढीतील प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतील, अशा नव्या स्वरूपाच्या थरारक कथांचा शोध घेणं हे चित्रपटनिर्माता म्हणून फारच उत्कंठापूर्ण काम होतं. माझ्या मनातील संकल्पनांना टीव्हीवरील छोट्या कालावधीच्या लघुपटांमध्ये बसविणं आणि सादर करणं हाही माझ्यासाठी एक नवा अनुभव होता.माझ्या कामांत मी नेहमीच नावीन्यपूर्ण आणि अधिक धाडसी संकल्पना सादर करून प्रेक्षकांच्या दृष्टिकोनात बदल करण्याचा प्रयत्न केलाआहे. आता ‘तीन पहेलियां’मार्फत प्रेक्षकांना मी या लघुपटांच्या मालिकेत गुंतवून ठेवू शकेन अशी आशा करतो.”‘तीन पहेलिया’ ही तिहेरी लघुपटांची मालिका प्रेक्षकांना नक्कीच एक थरारक अनुभव देईल- गुडलक, मिर्ची मालिनी आणि कॉपी या तीन लघुपटांतून गूढता, उत्सुकता, आश्चर्य आणि उत्कंठा या भावनांचे मिश्रण झाले आहे. या तिन्हीचित्रपटांच्या कथेमुळे तुम्हाला धक्का बसेल कारण त्या कथांना मिळणा-या अनपेक्षित ट्विस्ट  या प्रेक्षकांच्या कल्पनेपलीकडच्या असतील.गुडलकचे दिग्दर्शन सुजय घोष यांचे आहे.मिर्ची मालिनी लघुपटाचे दिग्दर्शन प्रतीम गुप्ता यांनी, तर कॉपीचे दिग्दर्शन श्री. अरिंदम सिल यांनी केले आहे.