Join us

लग्नाच्या बंधनात अडकले सुंगधा मिश्रा आणि संकेत भोसले, पहिला फोटो आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2021 16:39 IST

Sugandha mishra and sanket bhosale tie the knot: कॉमेडियन सुगंधा मिश्रा (Sugandha Mishra) आणि संकेत भोसले लग्नबंधनात अडकले आहेत.

कॉमेडियन सुगंधा मिश्रा  (Sugandha Mishra)  आणि संकेत भोसले लग्नबंधनात अडकले आहेत. 26 एप्रिल रोजी दोघांनी जालंधरच्या क्लब कॅबानामध्ये कुटुंबाच्या उपस्थितीत लग्न केले. सुगंधाचा मित्र आणि निर्माता प्रीती सिमन्सने तिच्या इंस्टा स्टोरीवर लग्नाचा फोटो पोस्ट केले आहेत.

जवळच्या लोकांच्या उपस्थित पार पडले लग्न कोरोनामुळे लग्नाला काही जवळचे नातेवाईक उपस्थित होते. पारंपारिक रीतीरिवाजांनुसार विवाह सोहळा संपन्न झाला. सुगंधाच्या कुटुंबियांनी सोशल मीडियावर आधीच सांगितले होते की कोरोनामुळे हा सोहळा साध्या पद्धतीने होईल.

मेहंदी सोहळ्याचे फोटोसुगंधाने तिच्या इंस्टाग्रामवर मेहंदी सेरेमनीचे काही फोटो केले आहेत. ज्यामध्ये तिच्या हातावर मेंहदी लागली दिसत आहे.या दरम्यान सुगंधाने हिरवा लेहंगा घातला आहे आणि त्यावर हेवी ज्वेलरी परिधान केली आहे. 

सुगंधा आणि संकेत यांची मैत्री अतिशय जुनी आहे. संकेतला द कपिल शर्मा शोमध्येदेखील सुगंधानेच आणले होते. तो या कार्यक्रमात केवळ काहीच भाग झळकला होता. त्याची मिमिक्री लोकांना खूपच आवडली होती.

सुगंधा मिश्राने गेल्या काही वर्षांत एक स्टँडअप कॉमेडियन म्हणून तिची एक वेगळी जागा निर्माण केली आहे. गानसमाज्ञी लता मंगेशकर यांची मिमिक्री तर ती खूपच छान करते. या मिमिक्रीसाठी तिला लता मंगेशकर यांच्याकडून देखील दाद मिळाली आहे. ती द कपिल शर्मा शो मध्ये देखील झळकली आहे. डॉ. संकेत भोसले हा प्रसिद्ध कॉमेडियन असून संजय दत्तची मिमिक्री तो खूप चांगल्याप्रकारे करतो. तो व्यवसायाने डॉक्टर आहे.

टॅग्स :द कपिल शर्मा शो