Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video:चाळीशीतला सुबोध विशीतला तरुण झाला, नव्या मालिकेचा हटके टिझर बघाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 09:17 IST

सुबोध भावे आणि शिवानी सोनार यांच्या नव्या मालिकेचा अनोखा प्रोमो भेटीला आलाय. यात सुबोधचा वेगळाच अवतार बघायला मिळतोय (subodh bhave, shivani sonar)

सुबोध भावे हा मराठी मनोरंजन विश्वातील सर्वांचा लाडका अभिनेता. सुबोधने आजवर विविध माध्यमांत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.  सुबोध पुन्हा एकदा प्रेक्षकांना भेटायला येतोय ते सुद्धा टेलिव्हिजन माध्यमात. सुबोधच्या नव्या मालिकेचा प्रोमो रिलीज झालाय. 'तू भेटशी नव्याने' असं या मालिकेचं नाव असून सुबोध आणि अभिनेत्री शिवानी सोनार यांची हटके केमिस्ट्री बघायला मिळणार आहे. इतकंच नव्हे सुबोधचा तरुण लूक प्रोमोत लक्ष वेधून घेतोय.

सुबोधच्या नव्या मालिकेचं नाव आहे 'तू भेटशी नव्याने'. मालिकेच्या प्रोमोत बघायला मिळतं की, शिवानी सोनारच्या हातात एक डायरी असते. या डायरीत माही नावाच्या एका व्यक्तीबद्दल लिहिलेलं असतंं. माही हा त्यांच्या कॉलेजमध्ये पास आऊट झालेला मुलगा. ज्याचा प्रेमावर विश्वास होता. शिवानी बोलत असताना सुबोधची एन्ट्री होते. सुबोध त्या कॉलेजमधला कठोर प्राध्यापक असतो. 'असली प्रेमाची थेरं करायची असतील तर घरी निघून जायचं', असं म्हणत सुबोध शिवानीला ओरडतो. 

पुढे मालिका २५ वर्ष मागे जाते. जिथे एक तरुण मुलगा 'जगायला श्वासाची नाही तर प्रेमाची गरज असते', असं म्हणतो. हा विशीतला तरुण मुलगा दुसरा  तिसरा कोणी नसून तो सुबोध भावेच आहे. सुबोधचा हा खास लूक सर्वांचं लक्ष वेधून घेतोय. ही नवी कोरी मालिका सोनी मराठीवर लवकरच सुरु होणार आहे. अनेक कलाकारांनी कमेंटच्या माध्यमात सुबोध - शिवानीच्या या नवीन मालिकेबद्दल उत्सुकता दर्शवली आहे.

टॅग्स :सुबोध भावे सोनी मराठीटेलिव्हिजन